मोदी फक्त बोलतात… पवार करून दाखवतात…

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपा विरोधात निर्धार यात्रेला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे विधिमंडळ गट नेता तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडावर जात असताना त्यांना गडाच्या पायथ्याशी बऱ्याच ठिकाणी कचरा पडलेला दिसला.

त्याकडे दुर्लक्ष न करता आणि क्षणाचा ही विलंब न करता तो  कचरा उचलून जवळच्या कचरा पेटित टाकला पवारांच्या या कृतीमुळे गडकिल्ले संवर्धन सोबतच “स्वच्छ भारत सुंदर भारत” या संकल्पनेला दुजोरा दिला असं म्हणलं आहे, स्वच्छ भारत हि संकल्पना जरी मोदींची असली तरी प्रत्यक्षात मोदी कधीही रस्त्यावर येऊन कचरा उचलताना दिसले नाही. यातून अत्यंत महत्वाचा संदेश अजित पवारांनी नकळत महाराष्ट्राला दिला आहे.

तसेच लोकसभा निवडणूक जवळ आल्या हे पाहून विरोधक एकत्र आले असून युती सरकारच्या विरोधात आम्ही ढोल बडवला आहे, आणि आता परिवर्तन होणारच असा निर्धन नेत्यांनी केला.

दरम्यान शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर पाचाड या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जेष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी नेते धनंजय मुंढे, माजी राज्यमंत्री गणेश नाईक राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.

You might also like