PM मोदी आणि HM शाह यांची शरद पवार यांच्याशी महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी तिन्ही नेत्यांनी राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या संकटाबाबत चर्चा केली. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
देशात महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रात दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी कोरोना नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमित शहा यांनी शरद पवार यांना फोन करून राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती घेत उपाय योजनांवर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी कोरोना नियंत्रणासाठी अनेक महत्त्वाच्या सूचनाही केल्या.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधिताची संख्या 690 वर गेला आहे. तर राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 36 वर पोहचली आहे. पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107 वर गेली आहे. तसेच देशात आतापर्यंत 3374 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासात 472 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

You might also like