‘या’ स्मार्टफोनचा वापर करतात ‘बाहुबली’ PM नरेंद्र मोदी, HM अमित शहा

पोलिसनामा ऑनलाईन टीम : आजच्या काळात असा कोणताच व्यक्ती सापडणार नाही जो स्मार्टफोन वापरत नाही. प्रत्येक व्यक्ती स्मार्ट फोन वापरतो. अशा काळात जगातील सर्वात मोठे नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्ट फोन वापरत असतील? जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा कोणता मोबाईल वापरत असतील? हे प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. चला तर मग जाणून घेऊ या मोदी आणि शहा कोणते मोबाईल वापरतात.

या स्मार्टफोनचा वापर करतात पीएम मोदी आणि अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री टेक्नोसॅव्ही आहेत. हे मंत्री सोशलमिडीयावर सक्रिय राहण्यासाठी ऍपल किंवा अँड्रॉइड चे वर्तमानातील सगळ्यात भारी मोबाईल फोन वापरतात. याशिवाय पंतप्रधान नरेद्र मोदी देखील ऍपल मोबाईलचा वापर करतात. गृहमंत्री अमित शहा ब्रँड न्यू ऍपल X मोबाईल फोनचा वापर करतात. IANS च्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शहा कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी व्हाट्सअप तसेच फेसबुकचा वापर करतात. शाह यांचे ट्विटरवर सध्या १.४ कोटी फॉलोवर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि दुबईच्या दौऱ्यावर असताना आयफोन 6 सीरीज चा मोबाईल वापरत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नरेंद्र मोदी ऍपलच्या सर्वश्रेष्ठ मोबाईलचा वापर करतात. मोदी यांचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर आहेत. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नरेंद्र मोदी यांचे ११ कोटी फॉलोवर आहेत. ते अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा अधिक फॉलोवर्स नरेंद्र मोदी यांना लाभले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आयफोन आणि अँड्रॉइड असे दोन्ही स्मार्टफोनचा वापर करतात. प्रधान यांचे ट्विटरवर ११ लाख फॉलोवर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी फेसबुक आणि ट्विटरवर सक्रिय आहेत. दैनंदिन कामकाजावर नजर ठेवण्यासाठी नितीन गडकरी धर्मेद्र प्रधान स्मार्टफोनचा वापर करतात. गडकरी यांचे ट्विटरवर ५१.५ लाख फॉलोवर आहेत.

आरोग्य विषयक वृत्त – 

नेहमी साडी परिधान करता ! मग ‘हा’ इशारा तुमच्यासाठीच

सांधे आणि स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

बेली फॅटमुळे महिलांच्या हाडांवर होतो दुष्परिणाम

रक्त शुद्धीकरणासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय