… म्हणून दिल्ली निवडणूकीत भाजपचा पराभव झाला, RSS नं सांगितली ‘अंदर की बात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली असताना देखील त्यांना दोन अंकी जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत. केवळ ८ जागांवर त्यांना समाधान मानावे लागले. लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरून सुद्धा महाराष्ट्रासारख्या राज्यात विरोधी बाकावर बसावे लागले. या अधोगतीची कारणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितली आहेत, आणि काय बदल करायला हवेत ते सुद्धा सांगितले आहे. दिल्लीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला असून प्रत्येक वेळी विधानसभा पातळीवरती अमित शहा आणि नरेंद्र मोदी जिंकू शकत नाहीत आणि दुसरे कारण म्हणजे असे की पक्षाने दिल्लीतील संघटना नव्याने उभारुन त्याला बळ दिले पाहिजे. नवीन नेतृत्व उभे केले पाहिजे, कारण दिल्ली मध्ये सलग दोन पराभवांना भाजपाला सामोरे जावे लागले आहे. २०१५ च्या निवडणुकीत त्यांना केवळ ३ तर २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ८ जागांवर समाधानी राहावे लागले. या व्यतिरिक्त आम आदमी पक्षाने यावेळी ७० पैकी ६२ जागा जिंकून दिल्ल्लीत सत्ता स्थापन केली आहे.

झारखंड आणि दिल्लीच्या पराभवासह मताधिक्य घटल्याने भाजप नाराज, मोठा निर्णय घेण्याची शक्यता
‘ ऑर्गनायझर ‘ या संघाच्या इंग्रजी मुखपत्रात संघ म्हणते की, २०१५ पासून आतापर्यंत भाजप तळागाळातील पातळीवर पायाभूत सुविधा पुनरुज्जीवित करण्यात आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यावर प्रसिद्धी घेण्यात अपयशी ठरले. लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाची दोन कारणे होती एक म्हणजे मोदी आणि शहा प्रत्येक वेळी विधानसभा पातळीवर मदत करू शकत नाहीत. आणि दिल्लीत संघटन नव्याने उभे करण्याशिवाय पर्याय नाही.

दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपने जोर लावूनही पदरात निराशा
गेल्या वर्षभरात भाजपने ज्या ज्या निवडणूक लढवल्या त्यामध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो. प्रचाराच्या वेळी अनेक बीजेपी नेते द्वेषपूर्ण विधाने करीत होते, देशद्रोह्यांना गोळ्या घाला , केजरीवालांना दहशतवादी सुद्धा म्हणण्यात आले. लोकसभेतील प्रचंड विजयनानंतर देखील बीजेपीला दिल्लीत मोठ्या दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांनी भाजपवर निशाणा साधत म्हणाले ,माझ्या जुन्या पक्षाला शुभेच्छा, छान कामगिरी दिल्लीतील पराभवावर बोलताना अमित शहा देखील म्हणाले की गोळ्या घाला , भारत- पाक सामना अशी विधाने टाळणे गरजेचे होते. पक्षातील नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण विधानांमुळे भाजपाला त्रास सहन करावा लागला. आम्ही केवळ निवडणूक जिंकायला किंवा हरण्यासाठी लढवत नाही. दिल्लीतील निवडणुकांबाबत माझे अंदाज चुकल्याचेही अमित शहांनी यावेळी सांगितले.