मागासवर्गीय असल्याने मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन – मी मागासवर्गीय असल्याने मला बदनाम करण्याचा डाव विरोधकांनी सुरु केला आहे. माझी जात सांगणाऱ्या शिव्या कॉंग्रेस आणि त्यांचे साथीदार देत आहेत. आता सर्व मागास समाजालाच ते चोर म्हणत आहेत. असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. माढा मतदारसंघातील उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

विरोधकांवर हल्लाबोल करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, देशात सध्या सर्व विरोधक केवळ एकाच व्यक्तीच्या मागे लागले आहेत. त्यांनी एकाच नावाचा धसका घेतला आहे. त्यांनी मोदीला हटविण्याचाच नारा केला आहे. बारामती, माढा, कुठेही जा मोदी हटावचा नारा आहेमला शिवी देता देता आता कॉंग्रेस संपुर्ण जातीलाच शिव्या घालत आहेत. चौकीदार चोर आहे चा मुद्दा चालला नाही तर ज्याचं नाव मोदी आहे. ते चोर का आहेत. मागास समाजाला नेहमी अडचणींचा सामना करावाल लागला आहे. मागास असल्यामुळे कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी माझी जात सांगणाऱ्या आणि माझी स्थिती दाखविणाऱ्या शिव्य़ा दिल्या आहेत. आता ते सर्व मागास समाजालाच ते चोर म्हणत आहेत. तुम्ही मला शिव्या द्या परंतु समजाला शिव्या देऊ नका असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Loading...
You might also like