अरे शरदराव आप भी, मोदींचा पुन्हा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शरदराव तुम्ही तर काँग्रेस सोडली होती. तुमच्या पक्षाचं नाव तर तुम्ही राष्ट्रवादी असं ठेवलंय परंतु तरीही तुम्ही त्यांच्यासोबत आहात. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथे आयोजित प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी ते आज अहमदनगरमध्ये आले होते. कॉंग्रेस राष्ट्रवादी देशाचे तुकडे करणाऱ्यांच्या सोबत आहेत. परंतु मला हे कळत नाही शरद पवार यांना काय झालं. अरे शरदराव तुम्ही तर देशाच्या नावावर काँग्रेस पक्ष सोडला होता. देशात दोन पंतप्रधान असण्याच्या गोष्टीवर तुम्ही कधीपर्यंत गप्प बसाल. काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्हीही विदेशी चष्म्यातून पाहात आहात. तुम्ही तर पक्षाचं नाव राष्ट्रवादी ठेवलं आहे. हे काय जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी ठेवलंय का ? छत्रपती शिवाजीच्या धरतीवर असून तुम्हाला झोप कशी येते. असा सवाल त्यांनी केला.

Loading...
You might also like