7 कोटी शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! कृषी कर्जावर 31 ऑगस्ट पर्यंत आता 7 टक्क्यांच्या ऐवजी द्यावं लागेल फक्त 4% व्याज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किसान क्रेडिट कार्ड (KCC-Kisan Credit Card) वर मोदी सरकारने देशातील 7 कोटी शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत कृषी कर्जावर केवळ 4 टक्के व्याज आकारले जाईल. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली आहे. ते मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देत होते. तोमर म्हणाले की, अनेक ठिकाणी अद्याप खरेदी चालू आहे. लॉकडाऊनमुळे देखील हे वाढविण्यात आले आहे. ही तारीख दुसऱ्यांदा वाढविण्यात आली आहे. जर या तारखा वाढवल्या नसत्या तर 31 मार्चनंतर किसान क्रेडिट कार्डवर घेतलेले कर्ज परत करणाऱ्यांना किमान 7 टक्के व्याज द्यावे लागले असते. लॉकडाऊन पाहता ते 31 मार्चपासून 31 मे पर्यंत वाढविण्यात आले. आता सोमवारी हे पुन्हा एकदा ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आले.

यामुळे काय होईल –
याचा अर्थ असा आहे की शेतकरी केवळ वर्षाकाठी 4 टक्के दराने केसीसी कार्ड व्याज देऊ शकतात. कोरोना विषाणू लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केसीसीवर शेतीसाठी घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा व्याजदर 9 टक्क्यांप्रमाणे आहे. पण त्यात सरकार 2 टक्के अनुदान देते. अशा प्रकारे ते 7 टक्क्यांपर्यंत खाली येते. पण वेळेवर परत केल्याने तुम्हाला 3% अधिक सूट मिळेल. अशा प्रकारे त्याचा दर शेतकऱ्यांसाठी फक्त 4 टक्के आहे. सहसा बँका शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत कर्ज परत करण्यास सांगतात. जर तोपर्यंत आपण बँकेला कर्जाची परतफेड केली नाही तर 7 टक्के व्याज द्यावे लागते.

जर तुमच्याकडे एक हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला किती कर्ज मिळेल ?
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा येथे असलेल्या प्रथमा बँकेचे शाखा व्यवस्थापक अंकुर त्यागी म्हणाले की, 1 हेक्टर शेतीवर 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. कर्जाची मर्यादा प्रत्येक बँकेची वेगवेगळी असते. यासाठी बँक आपल्याला किसान क्रेडिट कार्ड जारी करेल. ज्याद्वारे आपण कधीही पैसे काढू शकता. केसीसी कोणत्याही सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) कडून मिळू शकेल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) रुपे केसीसी जारी करते. तसेच हे कार्ड एसबीआय, बीओआय आणि आयडीबीआय बँकेकडून देखील घेता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like