तिहेरी तलाक ते काश्मीर, मोदी सरकारच्या बैठकीत होऊ शकतात ‘हे’ १० निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. कॅबिनेट मंत्र्यासह राज्यमंत्री या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीचा अजेंडा तयार करण्यात आला असून, यामध्ये मुस्लिम महिलांच्या अधिकारांचा आणि जम्मू-काश्मिरमधील आरक्षणासंबंधी निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात जेणेकरुन त्यांनाही काम करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारच्या सुचना बैठकीत दिल्या जाऊ शकतात. कॅबिनेटच्या बैठकित मागिल वर्षी आणलेल्या काही प्रमुख १० विधेयकांना पुन्हा मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

महाबैठकीतील महत्त्वाचे १० मुद्दे
१.
मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मॅरेज (तीन तलाक बिल) अध्यादेश.
२. इंडियन मेडिकल काउन्सिल (संशोधन) अध्यादेश
३. कंपनी (सुधार) आध्यादेश (दूसरा अध्यादेश), २१ फेब्रुवारी २०१९ ला पहिला अध्यादेश आणण्यात आला होता.
४. अनियमित ठेवींच्या अध्यादेशाचे नियमन, २१ फेब्रुवारी २०१९ रोजी अध्यादेश आणण्यात आला होता.
५. जम्मु आणि काश्मिर आरक्षणाचा अध्यादेश, १ मार्च २०१९ रोजी अध्यादेश आणण्यात आला होता.
६. आंध्र व इतर कायदे (दुरुस्ती) अध्यादेश
७. नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (नवी दिल्ली इंटरनॅशनल आरबिट्रेशन सेंटर) अध्यादेश
८. होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश
९. विशेष आर्थिक क्षेत्र (संशोधन) अध्यादेश
१०. केंद्रीय शिक्षण संस्था (शिक्षक कॅडरमध्ये आरक्षण) अध्यादेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरची ही पहिली बैठक आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीत फक्त कॅबीनेट मंत्र्यांनाच बोलवण्यात आले होते. या बैठकीत शहीदांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजच्या बैठकीत कॅबीनेट मंत्र्यांसह राज्यमंत्र्यांनाही बोलावण्यात आले आहे.
आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

Loading...
You might also like