नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही ‘या’ नेत्याचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचं भाकित केलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष चांगले काम करेल असे सांगतिले शिवाय नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचे सांगतिले आहे.

दिग्विजय सिंग हे मध्यमांशी बोलताना म्हणाले की, “काँग्रेस पक्ष हा चांगले काम करेल. काँग्रेसने दिलेले निकाल नक्कीच चांगले असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासनं दिली. परंतु मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते पुन्हा पंतप्रधान होऊच शकत नाही.” असे म्हणत दिग्विजय सिंह यांनी मोदींच्या पंतप्रधान होण्याविषयी भविष्यवाणी केली आहे. मोदींविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

दिग्विजय सिंग हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना मोदींच्या पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जनतेला दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणे गरजेचे असते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आश्वासन देतात असे त्यांचे म्हणणे होते. यावेळी जनतेने काँग्रेस पक्षाला निवडून द्यावे असे त्यांचे अप्रत्यक्षपणे म्हणणे होते.


ह्याहि बातम्या वाचा

देशात मोदींचीच हवा, शरद पवारांना बदललेल्या ‘हवे’चा अंदाज येतो : मुख्यमंत्री

युतीने आठवड्याभरात जागावाटपाबाबत सकारात्मक निर्णय घ्यवा,अन्यथा… : घटक पक्षांचा इशारा

युवकांनी इंदापूर तालुक्याचा राज्यात नावलौकिक वाढविला : हर्षवर्धन पाटील

शिरूर शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल

पाकिस्तानच्या खेळाडूचे ‘पीएसएल’ पेक्षा ‘आयपीएल’वरच प्रेम ; पहा व्हीडिओ