मोदींनी सभे दरम्यान पवार आणि राष्ट्रवादी बद्दल शब्दही काढला नाही

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वैयक्तीक आणि राजकीय हल्ले चढवले. मोदींच्या प्रत्येक सभेत शरद पवारांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केल्याचे आपण पाहिले असेल एकले असेल. मात्र आज पिंपळगाव बसवंतच्या कृषीपंढरीत अन् खुद्द शरद पवार बाजार समितीच्या आवारात मोदी यांची सभा झाली. मात्र, या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर चकार शब्दानेही टीका केली नाही. एवढेच नाही तर मोदींनी पवारांचा नामोल्लेखही केला नाही. त्यामुळे सभेच्या ठिकाणी हा विषय चर्चेचा ठरला.

नरेंद्र मोदी यांची आज नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी सभा झाली. मोदींची आजची सभा पेन्शनर आंदोलन, कांदा उत्पादकांचा निषेध, शेतकऱ्यांचे संभाव्या आंदोलन, मैदानात निघणारे साप अशा अनेक कारणांमुळे चर्चेत होती. मात्र सर्वाधीक उत्सुकता होती ती द्राक्ष, डाळींब व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा व पवार यांना माननाऱ्या शेतकऱ्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागातील सभेत मोदी काय बोलणार. मोदींनी या सभेत सर्जीकल स्ट्राईक, चौकीदार, काँग्रेस या सगळ्यांचा उल्लेख केला. मात्र पहिल्यांदाच त्यांनी शरद पवारांवर टीका तर दूर त्यांच्या नावाचा उल्लेखही केला नाही.

मोदींच्या भाषणात कांदा, शेतकरी आदींवर त्यांनी भाषण केले. त्यासाठी व्यासपीठावर स्थानिक नेत्यांकडून संदर्भ घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे शरद पवार व शेतकरी आंदोलनाचा या भागाशी निकटचा संबंध असल्याचा फिडबॅक त्यांनी नक्कीच मिळाला आसावा. कदाची त्यामुळेच त्यांनी शरद पावर यांचा उल्लेख केला नसवा असे बोलले जात आहे.