नरेंद्र मोदींचे माजी प्रचारप्रमुख काँग्रेसच्या गोटात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी अद्याप वेग घेतला नसला, तरी त्यांनी प्रचाराची संभाव्य योजना तयार केली आहे. प्रचाराची टीमही हळूहळू आकार घेत आहे. आगामी निवडणूकीत रॉबिन शर्मा हे प्रियंका गांधी यांचे प्रचार सल्लागार असणार आहेत.

शर्मा हे प्रशांत किशोर यांच्या सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नस (कॅग) आणि इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमीटीचे (आयपॅक) माजी संस्थापक आहेत. प्रशांत किशोर यांनी २००४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि नंतर बिराहचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रचारप्रमुख होते.

२०१४ मधील निवडणुकीत शर्मा हे कॅगने मोदी यांच्यासाठी चालविलेल्या प्रचार मोहिमेचे प्रमुख होते. या निवडणुकीत गाजलेली ‘चाय पे चर्चा’ ही मोहीम त्यांनीच रावबिली होती. २०१५ मध्ये त्यांनी नितीशकुमार यांच्यासाठी प्रचार केला. यामध्ये ‘हर घर नितीशे, हर मन नितीशे’ ही मोहीम राबविली होती.