14 लाख करदात्यांसाठी खुशखबर ! 5 लाख रुपयांपर्यंतचे IT रिफंड ‘तात्काळ’ अकाऊंट मध्ये होणार ‘जमा’, सरकारचा ‘आदेश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने कोविड-१९ च्या धोक्याला पाहता बुधवारी करदात्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना दिलासा देत घोषणा केली आहे. सरकारने पाच लाख रुपये पर्यंत सगळ्या प्रलंबित आयकर रिफंडला तात्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याचा फायदा १४ लाख करदात्यांना होईल. या निवेदनात म्हटले की, इन्कम टॅक्स रिफंड शिवाय सगळ्या प्रलंबित जीएसटी आणि कस्टम रिफंडलाही जाहीर केले जाईल. यामुळे एक लाख व्यवसायिकांना फायदा होणार आहे. सरकार एकूण १८,००० कोटी रुपयांचा रिफंड जाहीर करणार आहे.

आयकर विभागाने ट्वीट केले आहे की, कोविड-१९ संबंधित परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारने करदात्यांना तात्काळ दिलासा देत पाच लाख रुपये पर्यंतचे सर्व प्रलंबित आयकर रिफंड आणि जीएसट/ कस्टम रिफंड तात्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थ मंत्रालयाने उचललेले हे पाऊल नुकत्याच जाहीर केलेल्या १.७ लाख कोटींच्या प्रोत्साहन पॅकेजच्या पलीकडे आहे. सरकारने कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनपासून उद्भवलेल्या संकटाच्या परिस्थितीत प्रभावित झालेल्यांना दिलासा देण्यासाठी ही पावले उचलली आहेत. २५ मार्चपासून देशातील लॉकडाऊन लागू झाले, जे १४ एप्रिलपर्यंत राहणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाशी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांच्या मेडिकल इन्शुरन्स संरक्षणाची घोषणा केली आहे. याशिवाय रेशनकार्डधारकांना प्रति व्यक्ती निशुल्क पाच किलो अतिरिक्त धान्य आणि प्रति कुटुंब एक किलो डाळ देण्याची घोषणा सरकारने केली होती.