शेतीच्या सिंचनापासून ते शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजारच्या रक्कमेपर्यंत, ‘या’ आहेत मोदी सरकारच्या 5 कृषी योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत नेहमी बोलत असतात. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकर्‍यांसाठी अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत. शेतकर्‍यांसाठी आणलेल्या पीएम मोदी यांच्या काही योजनांबाबत जाणून घेऊयात…

1. पंतप्रधान किसान योजना
2018 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली. या योजनेत छोट्या शेतकर्‍यांना रुपये 6000 वार्षिक दिले जातात. मागील 23 महिन्यात मोदी सरकारने सुमारे 11.17 कोटी शेतकर्‍यांना 95 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केली आहे.

2. शेतकरी पिक विमा योजना
केंद्र सरकारने 2016 मध्ये पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली. या अंतर्गत शेतकर्‍यांना खरीपाच्या पिकासाठी 2 टक्के प्रीमियम आणि रब्बीच्या पिकासाठी 1.5% प्रीमियम भरावा लागतो. प्रीमियम केंद्र आणि राज्य सरकारद्वारे समान विभागून भरला जातो. भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी) ही योजना चालवते.

3. पंतप्रधान शेतकरी मानधन योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2019 मध्ये भारतातील छोट्या आणि अल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना सुरू केली. या योजनेत 5 कोटी शेतकर्‍यांना 60 वर्षाच्या वयानंतर किमान तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. 18 ते 40 वर्षामधील व्यक्ती यासाठी पात्र आहे.

4. पंतप्रधान कृषी सिंचन योजना
सिंचनाच्या समस्येत दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेत त्या उपकरणांवर आणि योजनांवर सबसिडी दिली जाते ज्याद्वारे पाण्याची बचत होऊ शकते. यासाठी सरकार ड्रिप आणि स्प्रिंकलर सिंचन प्रणालीसाठी प्रोत्साहन देते. जुलै 2015 पासून या योजनेला सुरूवात झाली.

5. राष्ट्रीय कृषी बाजार (ई – नाम)
राष्ट्रीय कृषी बाजार एक राष्ट्रीय स्तरावरील इलेक्ट्रॉनिक पोर्टल आधारित बाजार आहे, जो भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने विकसित केला आहे. विविध राज्यांमधील कृषी बाजारांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडून एकात्मिक राष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार (एनएएम) बनवण्याचा उद्देश आहे.