बंद नाही होणार प्लास्टिकची बाटली, मंत्री पासवान यांनी दिली सरकारच्या प्लॅनची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा सध्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही. कारण बंदीमुळे हजारो लोक बेरोजगार होतील. अशा परिस्थितीत सरकार बाटलीबंद पाण्यासाठी कंपोजिस्टेबल प्लॅस्टिकला प्रोत्साहन देईल. पुर्नवापर न होणाऱ्या प्लॅस्टिकला पर्याय मिळाल्याशिवाय पाण्याची बाटली बंद होणार नाही अशी माहिती अन्नपुरवठा व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.

रामविलास पासवान म्हणाले की, ‘आत्ता पाण्याच्या बाटलीला जो पर्याय सांगितला जात आहे, तो महाग आहे. बाटलीबंद पाण्यावर त्वरित बंदी घातली जाऊ शकत नाही. कारण, मोठ्या संख्येने लोक या रोजगाराशी निगडित आहेत. मात्र पाण्याच्या छोट्या बाटल्यांवर बंदी घातली जाऊ शकते. 200-300 ml पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घातली जाऊ शकते. पुर्नवापर न होणाऱ्या प्लॅस्टिकवर प्रतिबंध लावण्यासाठी सरकार बाटली बंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांना पीईटी (पॉलिएथिलीन टेरेफ्थेलेट) पासून बनवलेली बाटली वापरण्याची परवानगी देऊ शकते. कारण पीईटी बाटल्या एकापेक्षा जास्त वेळा वापरल्या जाऊ शकतात. सरकारी कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकार कंपोजिस्टेबल प्लॅस्टिकच्या बाटल्यांना प्रोत्साहन देईल.

कंपोजिस्टेबल प्लॅस्टिक –
कंपोजिस्टेबल प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. ऊस आणि मका यांपासून कंपोस्टेबल प्लॅस्टिक बनवतात. हे प्लॅस्टिक पुन्हा वातावरणात विरघळते. कम्पोझ करण्यायोग्य प्लॅस्टिकच्या वापरास मान्यता दिली जाईल.

2 ऑक्टोबरपासून देशभरात प्लॅस्टिकपासून बनवलेल्या पिशव्या, कप आणि स्ट्रॉ यांसारख्या वस्तूंवर बंदी येण्याची शक्यता आहे. शहरे आणि खेड्यांमध्ये पूर्नवापर न होणाऱ्या (सिंगल यूज) प्लॅस्टिकच्या वापरामुळे भारत जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये गणला जातो. 2022 पर्यंत देशात पूर्नवापर न होणारे प्लॅस्टिक पूर्णपणे संपवण्याचे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे.

Visit – policenama.com 

 

You might also like