कामाची गोष्ट ! सोनं खरेदी करणार असाल तर थोड थांबा, बदलणार आहे ‘हा’ नियम, सरकारने दिली मंजूरी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सरकार लवकरच सोन्याचे दागिणे खरेदी करण्याचा नियम बदलण्याच्या तयारीत आहे. याचा सराफ बाजारावर मोठा प्रभाव पडणार आहे. असे असले तरी ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे. मंत्री रामविलास पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की वाणिज्य मंत्रालयाने सोन्याच्या दागिण्यासाठी बीआयएस हॉलमार्किंगला अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. आता जागतिक व्यापार संघटनेने सूचित केल्यानंतर हे नियम लागू करण्यात येणार आहेत.

रामविलास पासवान यांनी सांगितले की वाणिज्य विभागाने 1 ऑक्टोबरला प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. परंतू याला लागू करण्यासाठी पहिल्यांदा डब्ल्यूटीओसंंबंधित काही तांत्रिक समस्या आहे. याला लवकरच सोडवण्यात येईल.

सध्या देशात जवळपास 800 हॉलमार्किंग केंद्र आहेत आणि फक्त 40 टक्के दागिण्यांची हॉलमार्किंग केली जाते. भारत सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. जेथे मोठ्या प्रमाणात दागिण्याची मागणी होते. भारतात दरवर्षी 700 – 800 टन सोने आयात केले जाते. डब्ल्यूटीओकडून निश्चित करण्यात आलेल्या नियामांनुसार या प्रकरणाला सूचित करावे लागेल. या प्रक्रियासाठी जवळपास 2 महिन्यांचा कालावधी लागेल.

सोन्याचे हॉलमार्किंग म्हणजे त्याच्या शुद्धतेचे प्रमाण. सध्या हे स्वैच्छिक आधारावार लागू करण्यात आले आहे. परंतू डब्ल्यूटीओकडून मंजूरी मिळाल्यानंतर याला अनिवार्य करण्यात येईल.
भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) कडे सर्व हॉलमॉर्किंगचे प्रशासकीय अधिकारात आहेत. यात तीन ग्रेड आहेत. 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्किंगसाठी मानक निश्चित करण्यात आले आहेत.

ग्राहकांना मिळणार थेट फायदा –
सध्या देशात सोन्याच्या दागिण्यांवर हॉलमार्किंग करणे स्वैच्छिक आहे. परंतू या नियमानंतर सर्व सराफांना दागिणे विकण्याआधी त्यावर हॉलमार्किंग घेणे आवश्यक असेल.

सध्या सोन्याच्या गुणवत्तेसाठी कोणतेही प्रमाण अनिवार्य नाही, अशाने ग्राहकांची अनेकदा फसवणूक केली जाते. कमी कॅरेटचे सोने विकले जाते आणि किंमत मात्र त्यापेक्षा जास्त गुणवत्तेने घेतली जाते.

हॉलमार्किंग योग्य नसल्यास सराफांना पहिल्या टप्प्यात नोटीस जारी केली जाईल. सध्याच्या नियमांनुसार हॉलमार्किंग केंद्र सुरु करण्यासाठी सराफांना 10,000 रुपये शुल्क द्यावे लागेल. हे केंद्र प्रत्येक दागिण्यावर 35 रुपये शुल्क घेते.

काय आहे हॉलमार्किंग –
दागिण्यात सोन्याचा प्रयोग किती केला आहे आणि इतर धातू किती आहेत याचा योग्य रेकॉर्ड असतो. नव्या नियमांतर्गंत आता प्रत्येक दागिण्यावर हॉलमार्किंग असणे आवश्यक असेल. यासाठी सराफांना परवाना घेणे आनिवार्य असेल.

Visit : Policenama.com