खुशखबर ! मोदी २.० सरकार १०० दिवसांत ३ लाख नोकर्‍या देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या काळातील अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मोदी सरकार आता जोमाने कामाला लागले आहे. यासाठी मोदी सरकारने नवा प्लॅन देखील बनवला आहे. यासाठी सरकारने मोठ्या १६७ कामांची यादी तयार केली आहे. या कामांचे रेकॉर्ड १०० दिवसात पुर्ण करण्यात येईल. या १०० दिवसांचे काऊंटडाऊनची सुरुवात ५ जुलैपासून सुरु झाली आहे आणि १५ ऑक्टोबर पर्यंत ही कामे पुर्ण करायची आहेत. ५ जुलैला निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. सरकारने या महत्वाच्या कामांत शिक्षण संस्थामध्ये ३ लाख नियुक्त्या करण्याचे ठरवले आहे.

कॅबिनेट सचिव प्रदीप सिन्हा यांनी सर्व सचिवांना सूचना पाठवल्या आहेत की सरकारने विचारमंथन करुन १६७ कामांची यादी बनवली आहे. ही कामे १०० दिवसात पुर्ण करायची आहेत. कॅबिनेट सचिव प्रदीप सिन्हा या कामांवर स्वतः  लक्ष ठेवून असणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागाच्या सचिवाला प्रत्येक शुक्रवारी ५ वाजेपर्यंत कामाचा साप्ताहिक अवहाल पाठवायचा आहे.

३ लाख पदांवर नियुक्त्या
या १६७ कामामध्ये सर्वात महत्वाचे काम असणार आहे ते म्हणजे उच्च शैक्षणिक संस्था, यावर मोठ्या प्रमाणात नियुक्त्या करायच्या आहेत. सूत्राच्या मते मानव संसाधन विभागाला सांगण्यात आले आहे की पुढील १०० दिवसात रिक्त ३ लाख पदांवर नियुक्त्या करायच्या आहेत.

पुढील १०० दिवसात सांस्कृतिक मंत्रालय सर्वात जास्त व्यस्त असणार आहेत. सरकारने मंत्रालयाला या दरम्यान नेहरु संग्रहालय आणि पुस्तकालय मध्ये देशाच्या पंतप्रधानांचे म्यूजियम तयार करण्यास सांगितले आहेत. लाल किल्यात देखील म्युजियम उद्घाटन करण्यास सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रम पुर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

मोदी सरकारने आपले लक्ष कोणत्याही परिस्थितीत पुर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणूकी दरम्यान पीएमओने सर्व विभागांना आणि मंत्रालयांना १०० दिवसांचा अजेंडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा