नरेंद्र मोदींनी केला आचारसंहितेचा भंग ? निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत . यानंतर निवडणूक प्रचाराने देशात जोर धरल्याचे दिसत आहे . निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिताही लागू झाली आहे .  यानंतर आता आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे .  या पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाची भेट घेतली.

पूर्व केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे . यात त्यांनी म्हटले आहे की , “आचारसंहिता लागू असतानाही अनेक पॅट्रोलपंप , एअरपोर्ट याठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स आहेत . राहुल गांधी यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून अश्लील टीका करण्यात येत आहे .  निवडणूक प्रचारात सैन्याचा वापर करण्यावर बंदी आणावी ” असे तीन मुद्दे उपस्थित करत काँग्रेसकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे.

काँग्रेसने केलेल्या तक्रारीनतंर आज रात्रीपर्यंत देशभरातील पॅट्रोल पंपावर , एअरपोर्टवर नरेंद्र मोदी यांचे किती पोस्टर्स लावण्यात आलेत , पोस्टर्स हटविण्यासाठी यंत्रणा सुरु आहे का  ?  याबाबत सविस्तर अहवाल मागवू तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या अश्लिल टीकाटीप्पणीवर रेकॉर्ड मागवण्यात येत आहे असं आश्वासन केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिलं आहे . याशिवाय निवडणूक प्रचारामध्ये सैन्याचा होणारा वापर या मुद्द्यावर बोलताना निवडणूक प्रचारामध्ये सैन्याचा वापर करु नये असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच दिले आहेत . असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

दरम्यान या आधीही दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे  .  पॅट्रोल पंप , मेट्रो स्टेशन , रुग्णालये , सार्वजनिक वाहतूक याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत , अशी तक्रार करत हे बॅनर्स हटविण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like