‘नरेंद्र मोदी हिंसाचारी, तेच हिंसा पसरवतात’, राहुल गांधींची जहरी टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी हिंसाचारी आहेत. तेच हिंसा पसरवत आहेत असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. आजकाल वर्तमानपत्रात मेक इन इंडिया नाही तर रेप इंडिया दिसत आहे आहे असं वक्तव्य राहुल यांनी आपल्या पूर्वीच्या भाषणात केलं होतं. यानंतर भाजपकडून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होताना दिसली. यानंतर माफी मागणार नसल्याचं स्पष्ट करतानाच राहुल गांधींनी नरेंद्र मोदी हिंसाचारी असल्याचं म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी हिंसाचाराचा प्रयोग करतात. नरेंद्र मोदी हे हिंसाचारी आहेत तेच हिंसा पसरवत आहेत. आज पूर्ण हिुंदुस्थानात हिंसा आहे. महिलांवर हिंसाचार होत आहे. नॉर्थ ईस्टमध्ये हिंसा होत आहे.काश्मीरमध्ये हिंसा होत आहे. पूर्ण देशात हिंसाच हिंसा आहे.”

‘हिंदुस्थानाची अर्थव्यवस्था त्यांनी नष्ट का केली ?’

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “आपली सर्वात मोठी स्ट्रेंथ होती आपली इकॉनॉमी. रघुराम राजन हे मला भेटले. त्यांनी मला म्हटलं की, अमेरिका, युरोपात हिंदुस्थानाबद्दल बोललंच जात नाही. आणि जेव्हा बोललं जातं तेव्हा इकॉनॉमी नाही तर अत्याचार, हिंसा या गोष्टींबद्दल बोलताना दिसत आहे. आपलं पूर्ण रेप्युटेशन खराब केलं आहे. हे सगळं कालही मी माझ्या भाषणात बोललो होतो. हिंदुस्थानाची अर्थव्यवस्था त्यांनी नष्ट का केली हे मला त्यांना विचारायचा आहे. महिलांचाही प्रश्न कायम आहे.”

‘भाजप आमदारानेच महिलेचा रेप केला, कोणतीही कारवाई नाही’

राहुल गांधी म्हणाले, “मोदींनीही दिल्लीला रेप कॅपिटल म्हटलं होतं. माझ्याकडं याचं व्हिडीओ आहे. ते मी सोशलवर शेअर करेल तेव्हा देश बघलेच. असं एकही राज्य नाही जिथे भाजपची सत्ता नाही आणि तिथे भरदिवसा रेप होत नाही. उन्नावमध्ये भाजप आमदारानेच महिलेचा रेप केला. पीडितेच्या गाडीचा अपघात घडवण्यात आला. नरेंद्र मोदींनी शब्दही काढला नाही. कोणतीही कारवाईदेखील झाली नाही.” असंही ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like