पंतप्रधानांनी इतक्या खालच्या थराला जाऊन बोलणे चुकीचेच : मनमोहन सिंग

वृत्तसंस्था :

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर अगदी खालच्या थराला जाऊन टीका केली. इतक्या खालच्या थराला जाऊन बोलणारे हे पहिलेच पंतप्रधान आहेत, अशी टीका करणे हे पंतप्रधानां शोभत नाही अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनेक मुद्द्यांनवरून त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले.

मोदी सरकारचे आर्थीक व्यवस्थापन आणि बँकिंग व्यवस्थापनात केलेल्या बदलांमुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. यावेळी काही दिवसांपूर्वी राज्यांमध्ये झालेल्या चलन तुटवड्याबद्दल देखील ते बोलले. हा चलन तुटवडा रोखता आला असता असे ही ते म्हणाले.

जीएसटी आणि नोटबंदी या दोन गोष्टी म्हणजे मोठे आशचर्य आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले, याचा परिणाम मध्यम आणि लहान उद्योजकांना बसला. कित्येक जणांच्या नोकऱ्या गेल्या. अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली. यावेळी निरव मोदी बद्दल बोलताना ते म्हणाले, २०१५-२०१६ दरम्यान निरव मोदी हालचाली सुरु असतील पण माहीत असूनही मोदीसरकारने काहीच पावले उचलली नाहीत. दोष सरकारच्या भूमिकेला दिला पाहिजे. पंतप्रधान मोदी दावोसमध्ये निरव मोदीच्या सोबत होते. त्यानंतर काही दिवसांनी निरव मोदींनी पाळ काढला. यावरून हे सरकार किती निष्क्रिय आहे हे समजते. अशा प्रकारे मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.