नरेंद्र मोदी म्हणतात ‘कदाचित भगवान शंकर मला बोलले, की बोलतोस खूप जरा काम पण करुन दाखव’ 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसीतील बहुप्रतिक्षित काशी विश्वनाथ मंदिर काॅरिडोरचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याआधी मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ मंदिरारत पूजा-अर्चा करण्यात आली. या प्रोजेक्टसाठी 600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मोदी हे उत्तर प्रदेशातील तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सर्वात आधी त्यांनी वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा-अर्चा केली. यानंतर त्यांनी काशी विश्वनाथ काॅरिडाेरचं भूमीपूजन केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईकदेखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले की, “भगवान शंकराची आधी कोणीही चिंता केली नाही. महात्मा गांधींनाही भगवान शंकराच्या या परिस्थितीची चिंता होती. 2014 च्या निवडणुकीत मी बोललो होतो की मी येथे आलेलो नाही, तर मला बोलावण्यात आलं आहे. कदाचित अशा कामांसाठीच मला बोलावण्यात आलं होतं.” पुढे बोलताना मोदी म्हणाले की, “कदाचित मला भगवान शंकरानेच सांगितलं असावं की, बोलतोस खूप पण जरा इकडे येऊन काम करुन दाखव.” असं त्यांनी यावेळी सांगितलं.

‘तर आज मी कदाचित उद्घाटन करताना दिसलो असतो’
याशिवाय मोदी म्हणाले की, “चारही बाजूंनी भिंतींनी घेरलेल्या भगवान शंकराच्या मुक्ततेची ही सुरुवात आहे. यासाठी मी योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारचे आभार मानतो. त्यांनी यामध्ये खूप सहकार्य केलं. जर तीन वर्ष आधी मला तत्कालीन सरकारची साथ मिळाली असती तर आज मी कदाचित उद्घाटन करताना दिसलो असतो.”

‘तेव्हापासून मला मंदिरासाठी काहीतरी करावं वाटत होतं’
मोदी म्हणाले की, “सक्रीय राजकारणात येण्याआधी मी काशीला आलो होतो. तेव्हापासून मला मंदिरासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. आज भगवान शंकराच्या आशिर्वादाने माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. आता गंगा नदीला थेट भगवान शंकराशी जोडलं आहे. आता भक्त गंगास्नान केल्यानंतर थेट भगवान शंकराच्या दर्शनासाठी येऊ शकतात” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून वाद, पोलिसांचा लाठीचार्ज

राज ठाकरेंचा एकला चलो रे ! चा नारा , लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार ?

पवारांचं जाहीर सभेतच वोटिंग … म्हणले शिरुर लोकसभेचा उमेदवार कोण हवा ?