PM मोदी यांची 8 मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक, ‘कोरोना’विरूद्ध लढाई आणि वॅक्सीनवर चर्चा

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागल्याने केंद्रासह सर्व राज्यांची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्ट झाली आहे. दिल्ली, केरळ, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये कोरोनाच्या केस पुन्हा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तातडीने 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठकी आयोजित केली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पुन्हा उद्भवलेल्या संकटाला तोंड देणे, उपाय योजनांचा आढावा आणि वॅक्सीनवर चर्चा होणार आहे.

कोविड-19 ची सध्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्वाच्या सूचना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 8 राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांचे अन्य प्रतिनिधींची डिजिटल बैठक घेणार आहेत. या राज्यांमध्ये केरळ, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ यांचा समावेश आहे. बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी सहभागी होऊ शकतात. कोरोना वॅक्सीनच्या वितरण धोरणावर सुद्धा या बैठकीत चर्चा होऊ शकते.

You might also like