भाजपकडून शिवसेनेला दुसरा मोठा धक्‍का ? लोकसभेच उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने एतिहासीक यश मिळवल्यानंतर शिवसेनेने भाजपाकडे काही मंत्री पदांची मागणी केली. त्यानंतर लोकसभा उपाध्यक्षपादाची मागणी करत शिवसेनेने भाजपावर एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र शिवसेनेच्या या दबावतंत्राला जास्त महत्व न देता भाजपाने लोकसभा उपाध्यक्षपद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरला देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मोदी सरकारकडून जगन मोहन रेड्डी यांना याबाबत ऑफर दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मोदी सरकारकडून वायएसआरला लोकसभा उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेने भाजपाकडे लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी आग्रह धरला होता.

मात्र मोदींनी हे पद वायएसआरला देणार असल्याने शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फिरणार असल्याचे दिसत आहे.लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवल्याने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मंत्रिमंडळातही काही मिळाले नाही.

त्यानंतर शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली. मात्र जगन मोहन रेड्डी यांना उपाध्यक्षपदाची ऑफर दिल्याने शिवसेनेला या पदापासूनही दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

Loading...
You might also like