कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास : नरेंद्र मोदी

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधील स्थानिक फुटिरतावादी नेत्यांच्या विरोधामुळे स्थानिक विकास होत नाही व ते मुख्य प्रवाहात येत नाहीत. स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकामधून लोकप्रतिनिधी निवडले जाऊन स्थानिक विकास व्हायला हवा होता. त्याबाबत भाजप सरकारचे प्रयत्न होते. अशा या फुटिरतावादी नेत्याच्या विरोधामुळे पीडीपीसोबतशी युती तोडली. या फुटिरतावाद्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली तरच काश्मीरचा विकास होईल. स्थानिक निवडणुका मधून हत्या, दंगली घडतील असा कांगावा पीडीपी ने केला.

जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकामधून ७५ टक्के मतदान होऊन एकही हिंसक घटना घडली नाही. निवडणुका झाल्या तरच विकास होऊ शकतो. जम्मू काश्मीर मध्ये प्रत्येक घरात आज वीज, शौचालय बनलं, कृषी आणि खादी क्षेत्राचा विकास, पर्यटनामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली. असं मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.

देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं काँग्रेसचं आश्वासन चिंताजनक असून ही भाषा फुटिरतावादी नेत्याची आहे. त्यासाठी अशा फुटिरतावाद्यांसोबत कठोर भूमिका घेतली पाहीजे. असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.