बाळासाहेब लाखो जनतेसाठी आजही प्रेरणादायीच, PM मोदींनी वाहिली श्रध्दांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असल्यामुळे संपूर्ण राज्यभर शिवसैनिकांनडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. मुंबईमध्ये देखील शिवाजी पार्कवर अनेक शिवसैनिकांनी बाळासाहेबांना जयंती निमित्त अभिवादन केले. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी देखील आज बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान आपल्या ट्विटमध्ये
महान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. धैर्यवान आणि दुर्दम्य साहस असलेल्या बाळासाहेबांनी लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. त्यांना नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत, असं ट्विट करत मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विटरद्वारे बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना दिला आहे. हिंदुस्थानात ज्यांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली. आणि आपल्या सगळ्यांना आजदेखील त्यांच्यापासून ऊर्जा प्राप्त होते. मी हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना अर्पण करतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आदरांजली अर्पण केली आहे.

वज्रापेक्षा कडक भूमिका मांडणारे बाळासाहेब ठाकरे होते. दुसरीकडे प्रेम करणारेदेखील बाळासाहेब होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला असं वाटेल की प्रेरणा कोणाकडून घ्यावी, तेव्हा बाळासाहेबांची आठवण त्या प्रत्येक व्यक्तीला प्रकर्षानं येत आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत राहो, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like