डॉ. अमोल कोल्हेंच्या भाषणाची PM नरेंद्र मोदींना ‘भुरळ’, मोदींकडून कोल्हेंच ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिरुर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या भाषणाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. सामान्य जनतेने तर त्यांच्या भाषणाचे कौतुक केलेच आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अमोल कोल्हेंच्या भाषणाचे कौतुक कलेले आहे.

अमोल कोल्हे यांनी आपल्या पहिल्या भाषणात शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांवर मुद्दे मांडले. त्यांनी केलेली विषयांची मांडणी आणि वक्तृत्वशैलीमुळे सर्वच भारावून गेले होते. त्यांच्या या भाषण शैलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले. मोदींनी अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्या नवाचाही समावेश होता.

दरम्यान, शिरूरमधील लोकसभेची निवडणुक अधिक चुरशीची होती. अमोल कोल्हे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. तर त्यांच्यासमोर ३ वेळचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आव्हान होते. आढळराव पाटलांसमोर अमोल कोल्हे टिकतील की नाही यावर शंका होती. मात्र अमोल कोल्हे हे आपल्या कलाक्षेत्रातील भूमिकांमुळे घराघरांमध्ये पोहचले आहेत. याचा फटका शिवाजीराव आढळराव पाटलांना बसला. अमोल कोल्हे ५ लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आले आणि शिरूर मतदार संघात आपला ठसा उमटवला. तसंच त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आरोग्यविषयक वृत्त

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

अकाली वृद्धत्व टाळायचेय ? मग ‘हे’ उपाय आवश्य करा

आयुर्वेदिक उपचारांनी दूर होऊ शकते वंध्यत्वाची समस्या

You might also like