CAA, अयोध्या, कलम 370 वर वर PM मोदींचे सूचक विधान, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याला मंजुरी दिल्यानंतर देशात मोठा वाद झाला. परंतु पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वात सरकार यापुढेही असेच मोठे आणि कठोर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. यावेळी पंतप्रधान मोदी आज अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाच्या भूमीपूजनासाठी लखनऊला आहे होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएए, राम मंदिर आणि कलम 370 याचा उल्लेख करत सांगितले की काही समस्या आम्हाला वारशामध्ये मिळाल्या आहेत, परंतु आम्ही आव्हानांना आव्हान देण्याच्या इराद्याने निघालो आहोत असे सूचक विधान मोदींनी केले.


राम मंदिराचा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने निकाली निघाला आहे, फाळणी झाल्यापासून आतापर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधील लाखो गरीब ज्यांच्यामध्ये दलित, वंचित शोषितांची संख्या अधिक आहे असे लोक आपल्या मुलींची अब्रु वाचवण्यासाठी भारतात आश्रयाला आले आहेत अशा आश्रितांना नागरिकत्व देण्याचा तोडगा 130 कोटी भारतीयांना काढला आहे.

पंतप्रधान मोदींना सवाल केला की उत्तर प्रदेशमध्ये काही लोकांनी सीएएला विरोध म्हणून आंदोलन करताना हिंसाचार केला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. असे नुकसान करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या घरात बसून आपण निवडलेला मार्ग योग्य होता का? आपली कृती योग्य होती का हे स्वत:लाच विचारुन पाहावे. जी जाळपोळ करण्यात आली, ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. ते त्यांच्या मुलांच्या उपयोगी आले नसते का?

वाजपेयींच्या जयंती दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल भूजल योजनेचं उद्घाटन –
वाजपेयींच्या 95 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने अटल भूजल योजना सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी अटल भूजल या नवीन योजनेचे उद्घाटन केलं आहे. या योजनेचा उद्दिष्ट आहे की प्रत्येक घर घरात पाणी पोहचवण्यात येईल. ज्या भागातील पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. या भागात विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे मोदींनी सांगितले. हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा अटल टनल नावाने ओळखले जाणार असल्याचे मोदींनी सांगितले.

या योजनेवर पाच वर्षात सहा हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या योजनेचा फायदा हरियाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होईल. याद्वारे देशाच्या 50 टक्के भागाचा समावेश होईल. पंतप्रधान मोदींनी सांगितले की सात राज्यातील 758 जिल्ह्यातील 8300 गावांमधील पाणीपातळीची स्थिती खूपच गंभीर आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/