पवार यशवंराव चव्हाणांच्या कुटुंबाकडून काहीच शिकले नाहीत

मोदींचा माढ्यातून पुन्हा शरद पवारांवर हल्लाबोल

अकलूज : पोलीसनामा ऑनलाईन – शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर कुटुंबावरून केलेल्या टिकेवरून नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर माढ्यातील सभेत केला आहे. कुटुंब हीच माझी प्रेरणा आहे. पवारांना हवा कळते. त्य़ांनी भीतीनं मैदान सोडून पळ काढला. पवारांनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये. अरे शरदराव तुम्ही तुमचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाकडून काही प्रेरणा घेतली असती तर बरं झालं असतं. अशी टिका त्यांनी केली आहे.

शरद पवार यांनी मोदींवर कुटुंबावरून टिका केली होती. त्यावर नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवारांना माझं कुटुंबच माझी प्रेरणा आहे. भगतसिंग, राजगुरु, चाफेकर बंधू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचेही कुटुंब होते. अरे शरदराव तुम्ही तुमचे गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाची प्रेऱणा घेतली असती तर बरं झालं असतं. तुमची प्रेरणा दिल्लीचं एकच कुटुंब आहे. असा घणाघात नरेंद्र मोदींनी केली.