Narendra Modi Stadium | काँग्रेस नरेंद्र मोदी स्टेडीयमचे नाव बदलणार; निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन

गांधीनगर: पोलीसनामा ऑनलाइन – Narendra Modi Stadium | गुजरात विधानसभा निवडणूक 2022 (Gujarat Assembly Election 2022) ची निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. भाजपने आपल्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने सत्ताधारी भाजप विरुद्ध आप (AAP) आणि काँग्रेस (Congress) अशी लढत होणार आहे. सर्वच पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी रेवडी वाटणे सुरु केले आहे. त्यात काँग्रेसने नरेंद्र मोदी स्टेडीयमचे (Narendra Modi Stadium) नाव बदलणार असल्याचे देखील आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात (Gujarat Election Manifesto) म्हंटले आहे. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सरदार पटेल स्टेडीयमचे नाव बदलून आपल्या नावे केले होते.

काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात महिला, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी यांना आकर्षित करण्याचा
प्रयत्न केला आहे. जाहीरनाम्यात काँग्रेसने सरकारी नोकऱ्यामधील कंत्राटी पद्धत संपविण्याची घोषणा केली आहे. 10 लाख सरकारी नोकऱ्या, बेकारांना 3000 बेरोजगार भत्ता, गॅस सिलेंडर 500 रुपयांना, 300 युनीट वीज मोफत, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात येईल आदी घोषणा केल्या आहेत. तसेच प्रत्येक नागरिकाला 10 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे.
तसेच पिकांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी ‘भाव निर्धारण समिती’ स्थापन करण्यात येणार असल्याचे देखील जाहीरनाम्यात नमूद केले आहे. (Narendra Modi Stadium)

विशेष म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel Stadium) यांचे नावे असलेले
स्टेडीयम नरेंद्र मोदी आणि गुजरात सरकारने नरेंद्र मोदी स्टेडीयम असे केले होते.
त्याचे देखील नाव बदलून पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम करण्यात येणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.

Web Title :-  Narendra Modi Stadium | we will change name of narendra modi stadium the big promises of congress in the gujarat election manifesto

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Gajanan Kirtikar | ‘…ते सर्व एका क्षणात कसे विसरलात?’; अरविंद सावंतांचा गजानन कीर्तिकर यांना सवाल

Gajanan Kirtikar | ‘शिंदे गट खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना…’ – खासदार गजानन कीर्तिकर