पंतप्रधान नरेंद्र मोदी – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात तब्बल अर्धा तास फोनवरुन चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेचच भूतानच्या दौऱ्यावर गेले होते. भूतानचा दौरा संपल्यानंतर भारतात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे थेट नाव न घेता मोदी म्हणाले की, पाकिस्तानमधील नेते भारताविरुद्ध करीत असलेली चिथावणीखोर विधाने आशियाच्या शांततेसाठी अनुकूल नाहीत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी व्हावा, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.

काश्मीरच्या निर्णयानंतर मोदींनी पहिल्यांदाच ट्रम्प यांच्याशी संवाद साधला. हा संवाद साधारण ३० मिनिटे चालला. कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाली. सीमापार चालणाऱ्या दहशदवादाबद्दल आणि अतिरेकी कारवायांबद्दल पंप्रधान मोदी यांनी यावेळी भाष्य केले.

दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्याशी इम्रान खान यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. काश्मीर प्रश्न भारताशी द्विपक्षीय मार्गाने सोडवावा, असे ट्रम्प यांनी त्यांना सांगितले होते. गरिबी, निरक्षरता आणि रोगराईविरुद्ध लढा देण्यासाठी हा मार्ग पत्करणाऱ्या कोणाशीही भारत सहकार्य करण्यास बांधील आहे, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like