Narendra Modi | ‘देशाला लुटणार्‍यांकडून परत घ्यायची हीच ती वेळ’; PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Narendra Modi | भ्रष्टाचार्‍यांना कुठलाही थारा देण्यात येणार नाही. भ्रष्टाचारी (Corruption) व्यक्तीला तुरुंगात टाकले जाते, त्यानंतर न्यायालयाकडूनही त्याला दोषी ठरविण्यात येते. तरीही काहीजण या भ्रष्टाचारी लोकांचे समर्थन करतात. देशाला लुटून खाणार्‍या भ्रष्टाचारी लोकांकडून आता लुटलेला माल परत घेण्याची वेळ आलीय, असे म्हणत मोदींनी (Narendra Modi) लाल किल्ल्यावरुन (Red Fort) विरोधी पक्षांना थेट इशारा देत ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचे अप्रत्यक्ष समर्थन केले. ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण (Flag Hoisting) केल्यानंतर देशवासीयांना संबोधित करत होते.

 

पंतप्रधान मोदी (PM Modi) पुढे म्हणाले, भारताची विविधता हीच भारताची खरी ताकद आहे. भारत ही लोकशाहीची जन्मभूमी आहे. लोकशाही (Democracy) हेच भारताचे (India) खरे सामर्थ्य आहे. देशातील सामूहिक चेतना हीच देशाची ऊर्जा आहे. देशासमोर येणार्‍या कोणत्याही संकटांना भारत देश पूर्ण ताकदीने सामोरे गेला.

 

मोदी (Narendra Modi) म्हणाले, देशासमोर सर्वात मोठ्या दोन समस्या आहेत. त्या म्हणजे भ्रष्टाचार आणि घराणेशाही. या दोन्ही समस्यांना आपण संपवून टाकायचे आहे. ज्यांनी देशाला लुटून खाल्ले, त्यांच्याकडून आता परत घ्यायची वेळ आली आहे. मी माझी लेकरं, माझा भाऊ, माझ्या भावाची लेकरं, माझा पुतण्या अशा राजकारणाने देशातील राजकीय वातावरण बिघडले आहे. त्यामुळे, देशवासीयांनी या घराणेशाहीच्या राजकारणाला हद्दपार करायला हवे.

यावेळी, नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पहिला संकल्प इप्सित भारत घडवण्याचा सांगितला.
तर दुसरा संकल्प म्हणजे, गुलामीचा एकही अंश भारतातील कोणत्याही भागात नाही.
तसेच यापुढेही तो राहता कामा नये. शेकडो वर्षातील गुलामी नष्ट करायची आहे.
तिसरा संकल्प म्हणजे आपल्याला आपला वारसा जपायचा आहे. आपल्या वारसावर आपल्याला गर्व असायला हवा.
चौथा संकल्प एकतेचा आहे. पाचवा संकल्प हा नागरिकांच्या कर्तव्यांचा आहे.
यामध्ये अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक नागरिक येतो.
पुढील 25 वर्षे देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, असे मोदी म्हणाले.

 

मोदी पुढे म्हणाले, महात्मा गांधी (Mahatma Gandhi), सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose),
बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar), स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मरण करण्याची ही वेळ आहे.
प्रत्येक भारतीयाला तिरंगा ध्वजामुळे प्रेरणा मिळाली. कोरोनाच्या काळात भारताने हार मानली नाही.
स्वांतत्र्याच्या दीर्घ कालखंडानंतरही भारताने आपला प्रभाव कायम ठेवला.
देशासमोर अन्नाच्या कमतरतेपासून ते कोरोनापर्यंत अनेक संकटे आली. देशाला मोठ्या युद्धांना सामोरे जावे लागले.
मात्र, देशाने कधीही पराभव स्वीकारला नाही. देश सर्व संकटांना सामर्थ्याने आणि ताकदीने सामोरा गेला.

 

Web Title : –  Narendra Modi | this is the time to take back the country from the looters and corruptionist pm modis direct warning from red fort pm narendra modi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा