नरेंद्र मोदींना हुकूमशाही पाहिजे : एनसीपी नेत्या फौजिया

लातूर : पोलिसनामा ऑनलाईन 

देशात आज संविधान सुरक्षित नाही. संविधानाची प्रत जाळली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते. ही बाब गंभीर असून हा देशद्रोह आहे. मात्र मन की बात करणारे मोदी यावर काहीच बोलत नाहीत. त्यांना संविधान नको आहे, लोकशाही नको आहे. त्यांना हुकूमशाही हवी असून सध्या देशात अघोषित आणीबाणी लागू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या फाैजिया खान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने संविधान बचाव अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ९ आॅक्टोंबर रोजी आैरंगाबाद येथे संविधान बचाव अभियानाचा समारोप होणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ddc9bcd6-c317-11e8-a607-97ffe42d5a6c’]

केंद्र सरकार म्हणजे एकटे नरेंद्र मोदी असल्याचे भासत आहे. कोणत्याही निर्णयात मंत्र्यांचा सहभाग दिसत नाही. ते स्वत:च सर्व निर्णय घेतात. मोदी यांची ही हुकूमशाही घातक असून ती देश बुडवीणारी आहे. असे त्या म्हणाल्या.

देशात व राज्यात कॉर्पोरेट भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणमात वाढला आहे. राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची कधीही पाठराखण केलेली नसून राफेल विमान खरेदीबाबत त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे, असेही त्या म्हणाल्या.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B07CNQRZBW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea49cfab-c317-11e8-baef-ed4de29883c2′]

यावेळी आमदार विद्या चव्हाण, आशा भिसे, राजलक्ष्मी भोसले, सोनाली देशमुख, बसवराज पाटील नागराळकर, संजय शेटे, मुर्जूजा खान, अफसर शेख आदी उपस्थित होते.