PM Kisan : मोदी सरकार देशातील कोटयावधी शेतकर्‍यांसाठी कोरोनाच्या संकटात खुशखबर देणार?

पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत असताना करोडो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शेतक-यांना आर्थिक मदत करणा-या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 8 व्या हफ्ता लवकरच शेतक-यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता शेतक-यांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानाचे संबोधन pmindiawebcast.nic.in वर पाहता येईल. यावेळी पंतप्रधान मोदी किसान योजनेच्या हप्त्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयानुसार PM Kisan चा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करण्याची तारीख ठरली आहे. यापूर्वीच्या वृत्तानुसार राज्य सरकारांनी रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर साईन केले आहे. तसेच केंद्र सरकारनेही फंड ट्रान्सफर ऑर्डर काढली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात Rft Signed by State For 8th Installment असा स्टेटस दिसत आहे. PMkisan.gov.in वर जाऊन तुमच्या खात्यामध्ये लॉगिन करून हे तुम्हाला तपासून पाहता येणार आहे.

कसे तपासाल ?
सर्वप्रथम PMkisan.gov.in संकेतस्थळावर वर लॉगिन करा. त्याठिकाणी Farmers Corner दिसेल. Farmers Corner मध्ये Beneficiary List हा ऑप्शन मिळणार आहे. Beneficiary List च्या बटनावर क्लिक करा. या पेजवर राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक निवडा. यानंतर तुमचा गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा. यात लाभार्थ्यांची संपूर्ण यादी येणार आहे. महत्वाचे म्हणजे ही लिस्ट आद्याक्षरानुसार असून ती एकापेक्षा जास्त पानांची आहे.

दरम्यान पीएम किसाननुसार रजिस्टर असलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक फायदा दिला जाणार आहे. मोदी सरकार या शेतकऱ्य़ांना कमी व्याजदराने लोनही देते. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे हे लोन दिले जात आहे. सरकारने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याचे आदेश दिले होते.