जगातील सर्वात ‘पावरफुल’ व्यक्‍ती म्हणून PM नरेंद्र मोदींची निवड, पुतिन-ट्रम्प हे ‘राष्ट्राध्यक्ष’ मोदींच्या मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक सन्मान प्राप्त झाला आहे. जगभरातील सर्वात ताकदवान राजकारणी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदींसाठी हि अत्यंत मोठी खुशखबर आहे. ब्रिटिश हेराल्ड ने घेतलेल्या एका पोलमध्ये वाचकांनी त्यांना २०१९ मधील सर्वात ताकदवान व्यक्ती म्हणून निवडले आहे.

या पोलमध्ये नरेंद्र मोदी यांनी व्लादिमीर पुतिन, डोनाल्ड ट्रंप आणि शी जिनपिंग यांना मागे सोडत पहिले स्थान मिळवले. त्यामुळे आता मोदींचे स्थान आणखी बळकट झाले आहे. या पोलमध्ये जगभरातील २५ महत्वाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर अंतिम पोलसाठी फक्त चार व्यक्तींची निवड करण्यात आली आणि यामध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारली.

याप्रकारे झाले मतदान

या प्रक्रियेत साध्या पद्धतीने मतदान न घेता प्रत्येक वाचकाला एक वन टाइम पासवर्ड (ओटीपी) देण्यात आला होता. त्याचबरोबर मतदान प्रक्रिया पार पडत असताना अनेक वेळा ती साईट क्रॅश देखील झाली होती. प्रत्येक जण आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी पर्यत्न करत होता.

कुणाला किती मतदान

या प्रक्रियेत नरेंद्र मोदी यांना सर्वात जास्त ३०.९ टक्के मतदान झाले. व्लादिमीर पुतिन यांना २९.९ टक्के मतदान झाले तर २१.९ टक्के नागरिकांनी अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड यांना मतदान केले. चीनचे राष्ट्रपति शी जिनपिंग यांना १८.१ टक्के मतदान मिळाले.