#GoBackModi : PM ‘मोदींना तामिळनाडूमध्ये ‘विरोध’पण चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांचे ‘स्वागत’

चेन्नई : वृत्तसंस्था – आज चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेत पंतप्रधान मोदी आणि क्षी जिनपिंग यांच्याबरोबर चर्चा होईल. परंतू आज या सर्व घटनांमध्ये ट्विटरवर एक हॅशटॅग सकाळपासून ट्रेंडिंगमध्ये आहे, तो हॅश टॅग आहे #GoBackModi. याला कारण आहे पंतप्रधान मोदी आज दुपारी बाराच्या दरम्यान चेन्नईला रवाना झाले, परंतू मोदींच्या या दौऱ्याला तामिळनाडूतील नागरिकांचा विरोध आहे. खरंतर तामिळनाडूतील लोकांचा विरोध क्षी जिनपिंग यांना नसून केवळ मोदींना आहे.

मोदी आणि जिनपिंग मामल्लापूरमला जाण्यासाठी रवाना होण्याआधीच सोशल मिडिया वरुन मोदींना विरोध होताना दिसला. विशेष म्हणजे सोशल मिडियावर आणखी एक हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये आहे तो म्हणजे #TNwelcomesXiJinping. म्हणजेच जिनपिंग यांचे तामिळनाडूत स्वागत करण्यात येत आहे.

तामिळनाडू जेव्हा कधी मोदी जातात तेव्हा त्यांना विरोध होताना दिसून येतो. मागीलवेळी देखील #GoBackModi हा हॅशटॅग वापरुन मोदींना विरोध दर्शवण्यात आला होता. प्रचारावेळी जेव्हा मोदी तामिळनाडूमध्ये गेले होते तेव्हा त्यांना विरोध झाला होता.

https://twitter.com/bassamhasankhan/status/1178596057673940993

जानेवारीत मोदी मदुराई येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी गेले तेव्हा देखील विरोध करण्यात आला होता. चेन्नईत आयआयटीमध्ये पदवीप्रदान समारंभात कार्यक्रमात आले असताना देखील त्यांना विरोध करण्यात आला होता.

हा विरोध फक्त तामिळनाडूतून नाही तर चीनमधून देखील आहे. चीनमध्ये #回到莫迪 (Huí dào mò dí) म्हणजेच मोदी परत जा हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.

https://twitter.com/tamizhsudhakar/status/1182470766429786112

https://twitter.com/anshumanpriyad1/status/1178554048120668160

Visit : Policenama.com