NDAच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय लोकशाही आघीडीच्या { एनडीए } नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या बैठकीत मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एनडीएतील ज्येष्ठ नेते, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल यांनी मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयु नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान व एनडीएच्या अन्य नेत्यांनी या प्रस्त्वावाला अनुमोदन दिले.

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मोदींची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या नेता निवडीचं हात उंचावून समर्थन केलं. यावेळी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा संपूर्ण सभागृहाने दिल्या. एनडीएच्या ३५३ सदस्यांनी मोदींची नेतेपदी निवड केल्याचे शहा म्हणाले. दरम्यान, त्याआधी भाजपच्या संसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यास माजी अध्यक्ष राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी अनुमोदन दिलं.