बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘मोदींच्या काळात जगातील मंदी उठली आणि भारतात आली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पदाच्या कालावधीत जगात मंदी आली होती पण भारतात कधी ह्या झळा बसल्या नाहीत. पण नरेंद्र मोदींच्या काळात सर्व काही उलट झालेले पाहायला मिळत आहे . जगातली मंदी संपली आणि आपल्या देशातली नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी केला

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण करणारे ‘मनमोहन पर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले . या पुस्तकाचे लेखन पत्रकार हेमंत देसाई यांनी केल आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित प्रकाशन सभारंभास माजी खासदार भालचंद्र मुणगेकर , आमदार भाई जगताप ,अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी उपस्थित होते. लेखक आणि विचारवंतांचा समाजावर दीर्घकाळ परिणाम होत असतो. १९९० च्याही आधीपासून देशाच्या अर्थकारणावर मनमोहन सिंगांचा मोठा प्रभाव होता. अगदी २०१४ पर्यंत देशातील प्रत्येक वळणावर त्यांचा प्रभाव होता.असं बाळासाहेब थोरात म्हणाले . माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पदाच्या कालावधीत जगात मंदी आली होती पण भारतात कधी ह्या झळा बसल्या नाहीत. पण नरेंद्र मोदींच्या काळात सर्व काही उलट झालेले पाहायला मिळत आहे .

जगातली मंदी उठली आणि आपल्या देशात आली आहे. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक आघाडीवर मजबूत करण्याचे काम केले.२०१४ च्या राजकीय वावटळीत सिंग यांचे व्यक्तिमत्व काहीसे झाकोळले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने जी लोकहिताची कामे केली ती मतदारांपर्यंत पोहचविण्यात आम्ही अपयशी ठरलो. आजही मोदींची आरती शेअर मार्केटवाले करत असले तरी सर्व मनमोहन सिंगची आठवण काढतात . याचे कारण त्यांचे अर्थकारण असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी असा विश्वास व्यक्त केला कि, दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश का मिळाले नाही, याचा पक्ष म्हणून आम्हाला नक्कीच विचार करावा लागेल. पण, केंद्रात सत्ता असताना सामाजिक दाम दंड भेद वापरूनही भाजपला यश मिळाले नाही. लोकांनी धार्मिक विद्वेषाचे राजकारण नाकारले .

तर, मनमोहन सिंग यांच्या अर्थनितीसोबत त्यांच्या समग्र जीवनाचा आढावा मनमोहन पर्व या पुस्तकात घेण्यात आला आहे. ४४ वर्षे सिंग देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय आहेत. देशाच्या अर्थखात्यातील जवळपास सर्व महत्वाची पदे त्यांनी भूषविल्याचे भालचंद्र मुणगेकर म्हणाले. यावेळी विश्वास उटगी, भाई जगताप यांचीही भाषणे झाली.

मनमोहन पर्व या पुस्तकात मनमोहन सिंग यांच्या अर्थनितीसोबत त्यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेण्यात आला आहे . ४४ वर्षे मनमोहन सिंग राजकीय आणि देशाच्या सामाजिक जीवनात सक्रिय आहेत. भालचंद्र मुणगेकर म्हणाले देशाच्या अर्थखात्यातील जवळपास सर्व महत्वाची पदे त्यांनी भूषिवले आहेत . यावेळी भाई जगताप ,विश्वास उटगी यांचीही भाषणे झाली.