मराठा आरक्षणाची चळवळ पुढे नेल्यानेच माझ्यावर दबाव टाकला – माजी आमदार नरेंद्र पाटील

सातारा/ मल्हारपेठ : पोलीसनामा ऑनलाइन –  सकल मराठा समाजाच्या पाटण तालुक्याच्या वतीने नवारस्ता येथे माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा श्वासापर्यंत पुढे घेऊन जाणार आहे. माझ्या वडिलांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सरकारच्या विरोधात आंदोलनाचा लढा उभारण्याची वेळ आली आहे. असे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पाटील यांनी पुढे म्हटले, आंदोलनाचा लढा उभा करण्यासाठी मराठ्यांनो जागे व्हा, जागे व्हा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. उपस्थित मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले, न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून मी काम पहिले १३ हजार कोटींची मदत देत २० हजार मराठा तरुणांना फायदा झाला आहे असे ते म्हणाले.

परंतु, या सरकारने मी मराठा आरक्षणाची चळवळ पुढे घेऊन जात असल्याचे समजल्यावर माझ्यावर दबाव टाकला. तो दबाव मी झिडकारत या पदाला लाथ मारत राजीनामा दिला. हि चळवळ यापुढेही मोठ्या जोमाने पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.