Maratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका, म्हणाले – राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून आक्रमक झालेले मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यावर Maratha Minister निशाणा साधला आहे. ओबीसी समाजाचे (OBC community) नेते राजकीय आरक्षण पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येतात. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? अशी गंभीर टीका पाटील यांनी केली आहे. या मंत्र्यांना लाजा वाटत नाही का? नाहीतर किमान आम्ही मराठा नाहीत हे तरी जाहीर करा, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 12) सोलापूरात Solapur मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठक ( Meeting) आयोजित केली होती.
बैठकीनंतर पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मराठा मंत्र्यावर Maratha Reservation घणाघाती टीका केली आहे.
ओबीसी समाजाचे नेते हे त्यांचे राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीमधील आरक्षण अडचणीत आल्यानंतर एकत्रित येतात.
राष्ट्रवादी काँग्रेस NCP अन् शिवसेनेतील Shiv Sena मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? अशी टीका पाटील यांनी केली.
आता घरात बसून, काळे झेंडे दाखवून मिळमिळीत आंदोलन करायचे नाही.
एखाद्या मंत्र्याची गाडी आली तर दगड घालून त्याची काच फोडली पाहिजे, असे पाटील म्हणाले.
दरम्यान नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही स्थानिकांची मागणी रास्त असून शासनाने याचा विचार करावा, असे पाटील म्हणाले.

PUBG गेम्स बनवणारी कंपनी पुढील आठवड्यात आणतेय 11 वर्षातील सर्वात मोठा IPO ! जाणून घ्या याच्या खास गोष्टी

दरम्यान सोलापुरात झालेल्या बैठकीला माजी सहकारमंत्री भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी हजेरी लावली. मराठा समाजाच्या Maratha community मागण्यांसाठी तरुणांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान इत्यादींना पत्र लिहावे असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले. तसेच आरक्षणाच्या बाबतीत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाच्या बाजूने उभे राहायला हवे असेही ते म्हणाले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : narendra patil targeted maratha ministers of mahavikas aghadi government over maratha reservation

हे देखील वाचा

Pune News | नवले ब्रिजजवळ भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत 43 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर सरदेशपांडे यांचा मृत्यू

Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवड शहरात आज 442 जण ‘कोरोना’मुक्त, 240 नवीन रुग्णांची नोंद

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 459 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा