Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संजय राऊत (Sanjay Raut) म्हणजे सिल्व्हर ओकच्या (Silver Oak) दारात उभा राहणारा शिपाई आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेचे (Shivsena) नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काल दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. यावरुन संजय राऊत यांनी टीका केली होती. डुप्लीकेट शिवसेनेचे नेते कोण हे त्यांनी आधी सांगावे? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) की अमित शाह? तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी दिल्ली म्हणजे मक्का-मदिना आहे. परंतु एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तिकडे का जातात? असा सवाल राऊतांनी केला होता. यावरुन नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.

सोनियाच्या दरबारी झुकणारे ते पहिले ठाकरे

नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले, संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या बाहेरचा शिपाई आहे. कुणाला नाव ठेवताय? मविआ सरकार स्थापन होणार होतं, तेव्हा आपल्या माहिती होतं ना, सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) अट ठेवली होती. जोपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझ्या दाराशी येत नाही तोपर्यंत मी सरकार स्थापनेला संमती देणार नाही. त्यावेळी दिल्ली दरबारी म्हणजे सोनियांच्या दरबारी कोण झुकलं असेल तर ते उद्धव ठाकरे. सोनियांच्या दारी झुकणारे पहिले ठाकरे ते होते. त्यामुळे राऊतांनी आम्हाला झुकणारे म्हणू नये, असे म्हणत म्हस्के यांनी राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सकाळी उठून भुकायचं

ज्या छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) बाळासाहेब ठाकरे यांना आतमध्ये टाकलं,
बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं त्यांच्यासोबत हे सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसले.
दाऊदचे हस्तक असलेल्या नवाब मलिकांना (Nawab Malik) यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं.
बाळासाहेबांनी शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) केली होती.
आमच्या युतीतले भागीदार हे भाजपचे आहेत. त्यात आम्ही गुन्हा केला नाही.
सकाळी उठायचं आणि भू भू करुन भुंकायचं हे योग्य नाही, अशी टीका म्हस्के यांनी केली.

Web Title : Naresh Mhaske | ‘Sanjay Raut is at the door of Silver Oak…’, Naresh Mhasken slams Raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | विनोद तावडेंकडून एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर, खडसे म्हणाले…

Shirur Lok Sabha | शिरूर लोकसभेचा राष्ट्रवादीमधील वाद मिटला?, विलास लांडे म्हणाले-‘अमोल कोल्हे यांना…’

72 Hoorain Teaser Release | लव जिहादचे रहस्य उलघडून सांगणारा आणखी एक चित्रपट ‘72 हुरैन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला