‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक नोकऱ्या गमावल्या’ : नरगिस फाखरी (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रॉकस्टार फेम अ‍ॅक्ट्रेस नरगिस फाखरी सध्या चर्चेत आली आहे. सध्या तिची एक मुलाखत सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. XXXchurch नवाच्या एका युट्युब चॅनलला तिनं ही मुलाखत दिली होती. ब्रिटनी डी ला मोरा हिनं तिची मुलाखत घेतली होती.

डी ला मोरा ही एक पॉर्न आर्टीस्ट आहे जी आजकाल स्टार्सच्या मुलाखती घेताना दिसत आहे. याच इंटरव्ह्यु सीरिजचा 5 वा भाग होता. या नरगिस फाखरीनं अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

नरगिस म्हणाली, “आईनं मला समजावलं होतं की, माझ्या मर्यादा काय आहेत. परंतु तिची सांगण्याची पद्धत चुकीची होती. ती मला भीती घालायची. नाती, पुरुष, सेक्स या सगळ्या गोष्टी त्यांच्यापासूनच आल्या आहेत आणि माझ्या डोक्यात चिकटल्या आहेत. जसं की, न्यू़ड न होणं, सेक्सबद्दलची नैतिकता. मी कधी खूप लाजाळू मुलगी होते. मी काही फ्रेंड्सना पाहिलं ज्यांनी त्यांच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. याचा परिणामही मी पाहिला. हे पाहून मी शिकले मग. मी त्या चुका करणं टाळलं.”

कास्टींग काऊचबद्ल नरगिस म्हणते…

नरगिस म्हणते, “मला प्रसिद्धीची नावाची भूक होती. परंतु यासाठी मी काहीही करू शकत नव्हते. मी न्यूड नव्हते होऊ शकत. डायरेक्टरसोबत झोपू शकत नव्हते. काही गोष्टी न करू शकल्यानं मी अनेक नोकऱ्या गमावल्या. माझं एक स्टँडर्ड होतं. माझी एक बाऊंड्री होती. जेव्हा या गोष्टीमुळं मी एकापेक्षा जास्त वेळा बाहेर काढली गेली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. पण मला एक ठाऊक होतं की, चांगली लोक नक्कीच जिंकतात.”

पॉर्नोग्राफीबद्दल नरगिस म्हणाली…

नरगिस म्हणाली, ” अनेक लोक आपल्या शक्तीचा दुरुपयोग करतात. त्यांना पैसा, पावर प्रसिद्धी तर मिळते परंतु आत्म्याची अशुद्धी मिटवता येत नाही. यानंतर त्यांच्या आत एक पोकळी तयार होते. त्यांना ती भरायची असते. नंतर सगळा खेळ मग मागणी आणि पुरवठ्याचा होऊन जातो. म्हणूनच पॉर्न आणि सेक्स खांद्याला खांदा लावून चालतात.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like