कौतुकास्पद ! अंगणवाडी सेविकेचं धाडस, तब्बल 18 किमी नाव चालवून ती पोहचते कर्तव्यावर

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्याला प्राधान्य देणारी माणसे क्वचितच आढळतात अशीच एक कर्तव्यदक्ष रणरागिणी असून, तिचे नाव रेणू वासवे (वय 27) आहे. त्या अंगणवाडी सेविका असून, त्यांना दररोज सुमारे 18 किमीचे अंतर पार करून अंगणवाडी गाठावी लागते. दोन मुलांच्या आई असलेल्या रेणू या आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांच्या मदतीसाठी ही वेगळ्या पद्धतीची नर्मदा परिक्रमा करत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी चिमलखाडी येथे रेणू या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना येथे येण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांनी नावेच्या मदतीने 18 किमी नर्मदा नदीचे अंतर पार करून आदिवासी मुले आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहाेचतात.

रेणू म्हणाल्या की, मार्चमध्ये लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर नर्मदा नदीच्या दुसऱ्या टोकावरील दोन भागांतील आदिवासी मुले, महिला अंगणवाडीमध्ये येणे बंद केले. अशा परिस्थितीत लहानपणी पोहणे आणि रोईंगमध्ये हातखंडा मिळवला होता. त्यामुळे नावेच्या माध्यमातून आदिवासींपर्यंत पोहाेचण्याचा आपण निर्णय घेतला. त्यासाठी एका मच्छीमाराकडून नाव उधार घेतली. माझे काम सहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिलांचे आरोग्य आणि वाढीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या वजनाची तपासणी करणे, सरकारकडून येणारे पोषण आहार त्यांना वाटप करणे असे आहे. मी एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातील पाच दिवस नावेच्या माध्यमातून 18 किलोमीटरचा प्रवास करत आहे.

रेणू वासवे सांगतात, दररोज एवढ्या लांब जाणे कठीण आहे. मात्र, मुले आणि गर्भवतींनी पौष्टिक भोजण खाणे तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. सकाळी साडेसात वाजता अंगणवाडीत पोहाेचतात. दुपारपर्यंत तिथे काम करून दुपारी भोजन केल्यानंतर एका तासानंतर त्या आपली नाव घेऊन वाड्यांमध्ये जातात. नावेच्या माध्यमातून नदी पार केल्यानंतर त्या डोंगराळ भागातून पायी घरी पोहाेचतात

You might also like