चांद्रयान 2 : ‘या’ कारणामुळं NASA घेऊ शकलं नाही विक्रम ‘लॅन्डर’चे फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान २ च्या माध्यमातून सर्व जगाची नजर भारतावर होती. भारताने केलेल्या कामामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते मात्र महत्वाच्या टप्प्यात ही मोहीम असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला इस्रोचे वैज्ञानिक हा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न करत होते मात्र वेळ निघून गेल्याने त्यांनी आशा सोडल्या.

नासाकडून सुद्धा भारताला अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला गेला. सहा सप्टेंबर रोजी विक्रमला हार्ड लँडिंग करावे लागले आणि विक्रमच संपर्क तुटला. त्यानंतर नासाकडून आम्ही विक्रमचे फोटो घेऊ असे सांगण्यात आले होते. मात्र चंद्रावरील लुनार डे संपल्यामुळे अंधार झाला. त्यामुळे संपर्क तुटलेल्या विक्रमचे फोटो मिळणे सुद्धा मुश्किल झाले. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नासाचे सॅटेलाईट LRO चंद्राभोवती फिरत आहे. मात्र विक्रम सध्या त्यांच्या ऑर्बिटच्या बाहेर आहे.

या कारणामुळे विक्रमचे फोटो घेता आले नाहीत
एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार विक्रमचा संपर्क ज्या ठिकाणाहून तुटला त्या ठिकाणी मोठा अंधार झाला असल्यामुळे फोटो काढण्यासाठी खूप त्रास झाला. चंद्रावर काही दिवसातच पुन्हा रात्र होणार आहे. यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सावली (अंधार) असणार आहे. यामुळे लूनार रिकॉनिस्सेंस ऑर्बिटर LROC तेथील फोटो नाही घेऊ शकणार.

“लॅन्डर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर यांचे फक्त पाच टक्के नुकसान झाले आहे, तर उर्वरित ९५ % भाग सुरक्षित आहे. यामुळे चंद्राबाबत माहिती मिळू शकणार नाही मात्र ९५ % सुरु असलेल्या भागातून दुसऱ्या प्रकारची माहिती मिळू शकणार आहे.”

काय झाले होते लँडर सोबत
७ सप्टेंबरला अर्ध्या रात्री १.५० वाजता विक्रम लँडरचा चंद्राच्या साउथ पोल वर पोहोचण्याच्या आधी संपर्क तुटला होता. जेव्हा ही घटना झाली तेव्हा चंद्रावर सूर्यकिरणे यायला सुरुवात झाली होती. चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीच्या १४ दिवसांच्या बरोबर आहे. अशात ७ तारखेनंतर १४ दिवस म्हणजेच २० – २१ सप्टेंबर पर्यंत चंद्रावर अंधार आणि रात्र असणार आहे.

Visit – policenama.com