अखेर ‘विक्रम’ लँडर सापडलं, NASA कडून फोटो जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या चंद्रयान २ या मोहिमेतील विक्रम लँडर अखेर सापडले असून नासाने त्याचा फोटो ट्विट केला आहे.  याबाबत नासाने म्हटले आहे की, विक्रम लँडर मिळाले आहे. नासाच्या लूनर रिकॉनिसेंस ऑर्बिटरकडून फोटो काढण्यात आले. त्यात विक्रम लँडर आढळून आला आहे.

चंद्रयान २ मोहिमेत चंद्राच्या दक्षिण भागात विक्रम लेंडर उतरविण्याचा भारताने प्रयत्न केला. ७ सप्टेंबर रोजी अखेरच्या क्षणी काही सेंकद असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. त्यावेळी विक्रम लँडर हे आपली गती कमी करु न शकल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले असावे असा अंदाज केला जात होता.

त्यानंतर इस्रोने अनेक दिवस त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नव्हता. आता नासाला हा विक्रम लँडरचा ठावठिकाणा सापडला आहे. नासाने म्हटले आहे की, दुर्घटना स्थळापासून ७५० मीटर दूर एका ठिकाणी एका चिखलात तीन तुकडे आढळून आले आहेत. नासाने अगोदरचा व विक्रम लँडर पडल्यानंतरचा असे दोन फोटो ट्विट केले आहेत.

Visit : policenama.com