काय सांगता ! होय, NASA नं 6 वर्षात बनवलं खास टॉयलेट, किंमत 174 कोटी रूपये

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा) अनेक दशकांपासून अंतरराष्ट्रीय अतराळ स्थानकावर जुन्या पद्धतीच्या टॉयलेटचा वापर करत आहे. आता नासाने नवीन टॉयलेट बनवले आहे, ज्याची किंमत सुमोर 23 मिलियन डॉलर्स आहे. म्हजणे सुमारे 174 कोटी रूपय. इत्याक्या रूपयात भारतात हजारोग टॉयलेट बनू शकतात. परंतु, नासाचे हे टॉयलेट खुपच खास आहे. हे स्पेश स्टेशनवर लावण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांत महिलांचे स्पेश स्टेशनवर जाणे-येणे वाढले आहे. अशात अडचण येत आहे होती की, जुने टॉयलेट महिलांच्या दृष्टीने नव्हते. यासाठी नासाने सह वर्षांनंतर एकदम नवीन टॉयलेट बनवले आहे, हे पुरूष आणि महिला दोघेही वापरू शकतात.

नासाने महिलांसाठी या टॉयलेटचे नाव ठेवले आहे – युनिर्व्हसल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टम हे टॉयलेट बनवण्यासाठी 6 वर्ष आणि 174 कोटी रूपये लागले आहेत. हे टॉयलेट सप्टेंबरमध्ये स्पेस स्टेशनमध्ये पाठवले जाईल.

आधीच्या जुन्या टॉयलेटला मायक्रोग्रॅव्हिटी टॉयलेट म्हटले जात होते. ते मल खेचून त्यास रिसायकल करत असे. परंतु आता जे टॉयलेट पाठवण्यात येणार आहे त्यामध्ये फनल-फंक्शन सिस्टम आहे. जेणेकरून अ‍ॅस्ट्रोनॉट्स टॉयलेटचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतील.

या नवीन टॉयलेटला जागासुद्धा कमी लागणार आहे. याचे वजनसुद्धा कमी आहे. तसेच वापरण्यासही सोपे आहे. यामध्ये युरिन ट्रीटमेंटची सुविधा आहे. सोबतच अंतराळ प्रवाशांना टॉयलेटवर बसताना पाय अडकवण्यासाठी जागाही बनवली आहे.

अगोदर या टॉयलेटमध्ये युरीन आणि मल वेगवेगळे करणे खुपच अवघड होते. त्यास रिसायकल करण्याची पद्धतसुद्धा किचकट होती. परंतु, आता नव्या टॉयलेटमध्ये युरीन आणि मल सहज वेगवेगळे होईल आणि रिसायकलही वेगवेगळे होईल.

स्पेस स्टेशननंतर या टॉयलेटचा वापर त्या रॉकेटमध्ये किंवा स्पेसक्राफ्टमध्ये सुद्धा करता येईल, जे नासा 2024 मध्ये आपल्या मून मिशनमध्ये पाठवणार आहे. या मिशनचे नाव अर्टेमिस मिशन आहे.