NASA नं रचला इतिहास, पहिल्यांदा एखाद्या दुसर्‍या ग्रहावर उडवण्यात आले हेलिकॉप्टर

ह्यूस्टन : अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाने 19 एप्रिल 2021 ला इतिहास रचला. दुपारी सुमारे 4 वाजता एखाद्या दुसर्‍या ग्रहावर पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडवण्यात आले. या हेलिकॉप्टरचे नाव इंजीन्यूटी हेलिकॉप्टर आहे. अगोदर असे ठरले होते की, हे 11 एप्रिलला उडवायचे. परंतु ती तरीख रद्द करून 14 एप्रिल 2021 तारीख ठरवण्यात आली. परंतु, नासाने म्हटले की, हेलिकॉप्टरच्या टेस्ट उड्डाणादरम्यान टायमर व्यवस्थित काम करत नव्हता, यासाठी उड्डाण टाळण्यात आले होते.

नासाने सांगितले की, टायमरच्या चुकीमुळे प्री-फ्लाईट मोडने फ्लाईट मोडमध्ये येण्याच्या व्यवस्थेत थोडी गडबड झाली होती. इंजिन्यूटी हेलिकॉप्टर पूर्णपणे सुरक्षित आणि पृथ्वीशी संपर्कात आहे. यामध्ये लावलेला वॉचडॉग टायमर पृथ्वीवरून कमांड व्यवस्थित घेत होता. तर फ्लाईट सीक्वेन्स कमांड संथ झाली होती. यासाठी ते दुरूस्त करून 19 एप्रिलची तारीख ठरवण्यात आली होती.

 

 

 

 

 

मार्स पर्सिव्हरन्स रोव्हरच्या पोटाखाली कव्हर करून इंजीन्यूटी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. 5 एप्रिलला मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर ते उतरले होते. हे हेलिकॉप्टर मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग आणि तेथील वायुमंडळात रोटरक्राफ्ट टेक्नोलॉजीचा वापर करता येऊ शकतो की नाही यासाठी उडवण्यात आले. 19 एप्रिलचे उड्डाण एक प्रायोगिक उड्डाण होते. यातून हे जाणून घ्यायचे होते की आपण दुसर्‍या ग्रहावर हेलिकॉप्टर उडवू शकतो किंवा नाही.

इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला रोव्हरने जमीनीपासून चार इंच वर सोडले. पृष्ठभागावर हेलिकॉप्टर पडल्यानंतर रोव्हर पुढे गेले. 1.8 किलोग्रॅमच्या इंजीन्यूटी हेलिकॉप्टरला पर्सिव्हरन्स रोव्हरच्या खाली चाकांच्या वर पोटात एका कव्हरच्या आत सुरक्षित ठेवले होते. 21 मार्चला हे कव्हर हटवण्यात आले होते. नासाने ट्विटर हँडलवर लिहिले होते की, लवकरच या रोव्हरच्या पोटातून उडणारा पक्षी निघेल. हा नवीन मार्ग खुले करेल.

इंजीन्यूटी हेलिकॉप्टरच्या आत सौर ऊर्जेने चार्ज होणारी बॅटरी लावली आहे. याच्या पंखांच्या वर सोलर पॅनल आहे. तो जेवढा गरम होईल बॅटरीला तेवढी ताकद मिळेल. सोबतच हेलिकॉप्टरच्या आत उष्णता कायम राहील जेणेकरून मंगळ ग्रहाचे बदलते तापमान सहन करेल. मंगळावर दिवसा यावेळी 7.22 डिग्री सेल्सियस तापमान आहे. जे रात्री कमी होऊन मायनस 90 डिग्री सेल्सियस पर्यंत जाते.