अंतराळात घडणार ‘इतिहास’, पहिल्यांदाच 2 महिला करणार एकाचवेळी ‘स्पेसवॉक’ !

पोलीसनामा ऑनलाइन – अंतराळात एक इतिहास बनणार आहे. कारण अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला अंतराळवीर एकत्र आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर स्पेसवॉक करणार आहेत. 21 ऑक्टोबरला अंतराळवीर जेसिका मीर आणि क्रिस्टीना कोच ISS च्या बाहेर येतील आणि स्पेस स्टेशनच्या सोलर पॅनलवर लावण्यात आलेल्या लिथियम ऑयन बॅटरी बदलतील. या आधी महिलांचा स्पेसवॉक प्रोग्राम मार्च महिन्यात झाला होता परंतू स्पेससूट नसल्याच्या कारणाने हा स्पेसवॉक टाळण्यात आला होता.

ऑक्टोबर महिन्यात एकूण मिळून 5 स्पेसवॉक करण्यात येईल. या स्पेसवॉकच्या माध्यमातून स्पेस स्टेशनवर 6 अंतराळवीर बाहेर निघून स्पेस स्टेशनची देखभाल करतील. यावेळी अंतराळ स्टेशनवर जेसिका मीर, क्रिस्टीना कोट, एंड्रयू मॉर्गन, ओगेल स्क्रीपोचा, एलेक्जेंडर स्कवोर्तसोव आणि लूका पारमितानो हे सहभागी असतील. हे सर्व ऑक्टोबर महिन्यात विविध तारखांना स्पेसवॉक करतील. याशिवाय विविध पाच स्पेसवॉक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होतील.

या तारखांना स्पेसवॉक –
11 ऑक्टोबर – क्रिस्टीना कोच आणि एंड्रयू मॉर्गन स्पेस स्टेशन पासून बाहेर निघून सोलरवर लावण्यात आलेल्या लिथियम ऑयनच्या बॅटरी बदलतील.
16 ऑक्टोबर – जेसिका मीर आणि एंड्रयू मॉर्गन स्पेस स्टेशनच्या बाहेर निघून सोलरवर लावण्यात आलेली लिथियम ऑयनची बॅटरी बदलतील.
21 ऑक्टोबर – जेसिका मीर आणि क्रिस्टीना कोच ISS चा बाहेर पडून स्पेस स्टेशनवर सोलरमधील लिथियमची बॅटरी बदलतील.
25 ऑक्टोबर – जेसिका मीर आणि लूका परमितानो स्पेस स्टेशनच्या बाहेर येऊन सोलरवर लावण्यात आलेली लिथियमची बॅटरी बदलतील.
31 ऑक्टोबर – ओलेग स्क्रीपोचा आणि एलेक्जेंडर स्कवोर्तसोव देखील स्पेश स्टेशच्या बाहेर येऊन स्पेस स्टेशनची देखभाल दुरुस्ती करतील.

नासासह सर्व अंतराळ संस्था आपल्या अंतराळवीरांना स्पेसवॉकचे प्रशिक्षण देतात. जेव्हा अंतराळवीर प्रशिक्षणादरम्यान स्पेससूट घालतात तेव्हाच त्यांना मायक्रोगॅविटीचे प्रशिक्षण देण्यात येते. कारण अंतराळातील वातावरण पूर्णता वेगळे असते. पृथ्वीपासून जवळपास 421 किमी वर तुम्हाला अंतराळाच्या वातावरणानुसार काम करायचे असते.

आता स्पेसवॉक करण्यासाठी अंतराळ स्टेशनवर तीन सूट उपलब्ध –
मार्चमध्ये स्पेसवॉकनंतर आतापर्यंत अंतराळात तीन स्पेससूट उपलब्ध आहेत. आता एकवेळी तीन अंतराळवीर एकत्र स्पेसवॉक करु शकतील. परंतू फक्त दोन – दोन अंतराळवीराचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. तीसरा बॅकअप सपोर्ट म्हणून ठेवला आहे.

Visit : Policenama.com