उगाच होत नाही दिल्लीमध्ये ‘घुसमट’, NASA च्या फोटोमध्ये दिसले ‘पालापाचोळा’ जळत असलेले 2900 ‘निशाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली मधील एनसीआर भागात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण यामुळे दिल्लीकर मोठ्या प्रमाणावर चिंताग्रस्त आहेत. परंतु या ठिकाणी प्रदूषणाचे आणखी एक कारण उघड झाले आहे आणि ते म्हणजे शेजारील राज्यांमध्ये जाळला जाणारा पालापाचोळा (पाचट, पेंढ्या) होय. याबाबतचा नासाने एक सॅटेलाईट फोटो समोर आणला आहे.

फोटोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पंजाबच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा (पाचट) जळत आहे. हरियाणाच्या देखील अनेक भागांमध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे. एकूण 2900 जागांवर हा प्रकार सुरु असल्याचे फोटोमध्ये दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरियाणामध्ये यावर अधिक काम केले जात आहे. मात्र पंजाब याबाबत अजून बराच मागे आहे. कारण पंजाबमध्ये 25 % नी याबाबत वाढ झालेली आहे. राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून शेतातील पालापाचोळा जाळण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मात्र कायद्याने याला बंदी आहे. याबाबत अनेकांना दंड भरावा लागला आहे.

योगी सरकारने उचलले कडक पाऊल
योगी सरकारने या विरोधात कडक पाऊल उचलत वायू प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच असे करणाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश देखील दिले आहेत. याबाबत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याची गरज असल्याचे सांगितले.

केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, 2016 ते 2018 च्या आसपासच्या राज्यांमध्ये असा पालापाचोळा जाळण्याच्या प्रमानात 41 % नी घसरण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते.

Visit : Policenama.com