48 तासानंतर बदलणार अमेरिकेचा इतिहास, पुन्हा सुरू होईल ‘मानव मिशन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकन विज्ञानाचा इतिहास 48 तासांनंतर बदलणार आहे. अमेरिका अंतराळ विज्ञानाच्या जगात एक नवीन पाऊल टाकणार आहे. या प्रसंगाचे साक्षीदार स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगभरातील वैज्ञानिक असतील. अंतराळातील मानवनिर्मित मिशनसंदर्भात 48 तासांनंतर होणारी घटना ही मैलाचा दगड ठरू शकते. याबद्दल जाणून घेऊया…

21 जुलै 2011 नंतर प्रथमच अमेरिकन धरतीवरील एखादी मानवनिर्मित मोहीम अवकाशात जाईल. तेही अमेरिकन रॉकेटने. म्हणजेच 9 वर्षानंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा त्यांच्या अंतराळ केंद्रातून अंतराळवीरांना स्वदेशी रॉकेटमध्ये बसवून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (आयएसएस) पाठवेल. नासाने त्याची तारीख देखील निश्चित केली आहे. 27 मे 2020 रोजी सायंकाळी 4.33 वाजता नासा अमेरिकन धरतीवरील दोन अमेरिकन अंतराळवीरांना अमेरिकन रॉकेटमध्ये बसवून आयएसएसकडे पाठवेल. या मोहिमेतील अंतराळ स्थानकात जाणारे अमेरिकन अंतराळवीरांचे नाव रॉबर्ट बेन्केन आणि डग्लस हर्ले असे आहे.

या दोन्ही अंतराळवीरांना अमेरिकन कंपनी स्पेस-एक्स च्या स्पेसक्राफ्ट ड्रॅगन (Space X Drgaon) ने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवले जाईल. स्पेस-एक्स ही अमेरिकन उद्योगपती एलन मस्कची कंपनी आहे. ही कंपनी नासाबरोबर मिळून भविष्यात अनेक अंतराळ मोहिमेवर काम करीत आहे. स्पेस-एक्स ड्रॅगन यान अमेरिकेच्या सर्वात विश्वासार्ह रॉकेट फॉल्कन-9 वर बसविण्यात येईल. यानंतर फॉल्कन-9 रॉकेट फ्लोरिडाच्या लाँच कॉम्प्लेक्स 39ए पासून प्रक्षेपित केले जाईल. या मिशनला डेमो -2 मिशन असे नाव देण्यात आले आहे. डेमो -1 मिशनमध्ये ड्रॅगन स्पेसक्राफ्टने अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या वस्तूंची वाहतूक केली होती.

या मोहिमेमध्ये रॉबर्ट बेन्केन अंतराळ यानाचे डॉकिंग म्हणजेच अंतराळ स्थानकास जोडणे, अनडॉकिंग म्हणजेच अंतराळ स्थानकापासून वेगळे करणे आणि त्याचा मार्ग निश्चित करतील. बेन्केन यापूर्वी दोनदा अवकाश स्थानकात गेले आहेत. त्यापैकी एकदा 2008 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2010 मध्ये. त्यांनी तीन वेळा स्पेसवॉक केला आहे.

तर डग्लस हर्ली ड्रॅगन अंतराळ यानाचे कमांडर असतील. ते प्रक्षेपण, लँडिंग आणि रिकव्हरीसाठी जबाबदार असतील. डग्लस 2009 आणि 2011 मध्ये अंतराळ स्थानकात गेले होते. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर होते. नंतर 2000 मध्ये ते नासाशी जोडले गेले. यापूर्वी यूएस मरीन कॉर्प्समध्ये ते फायटर पायलट होते.

मे महिन्यात सुरू झालेल्या मोहिमेनंतर हे दोन्ही अंतराळवीर 110 दिवस अंतराळ स्थानकावर थांबतील. स्पेस-एक्स ड्रॅगन कॅप्सूल एका वेळी 210 दिवस अवकाशात वेळ घालवू शकतो. त्यानंतर त्याला दुरुस्तीसाठी परत पृथ्वीवर यावे लागेल. 9 वर्षांनंतर अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आपला व्यावसायिक क्रू प्रोग्राम पुन्हा सुरू करीत आहे. या मोहिमेच्या यशानंतर अमेरिकेला त्यांचे अंतराळवीर अंतराळात पाठविण्यासाठी रशिया आणि युरोपियन देशांकडे जाण्याची गरज भासणार नाही.

27 जुलै 2011 रोजी नासाने आपला सर्वात यशस्वी स्पेस शटल प्रोग्राम बंद केला होता. अंतराळ शटल प्रोग्रामद्वारे अंतराळ स्थानकात 135 उड्डाणे करण्यात आली होती. 30 वर्ष चाललेल्या या प्रोग्राममध्ये 300 हून अधिक अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात आले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like