NASA मंगळ ग्रहावर हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी आज Perseverance करणार लाँच

फ्लोरिडा : अमेरिकन स्पेस एजन्सी (नासा) मंगळ ग्रहावर 30 जुलैला आणखी एक रोव्हर लाँच करणार आहे. नासाच्या या मिशनचे नाव मार्स 2020 आहे. नासाने मंगळावर आतापर्यंत 8 यशस्वी मिशन पूर्ण केल्या आहेत. या मिशनमध्ये नासाचे रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर प्राचीन जीवनाची माहिती जमवण्यासह तेथील दगड आणि माती सुद्धा पृथ्वीवर आणेल. या रोव्हरसोबत इंजीन्युटी नावाचे एक छोटे हेलिकॉप्टरसुद्धा जाईल. हे हेलिकॉप्टर मंगळावर एकट्याने उड्डाण घेईल, असा प्रयत्न केला जाणार आहे.

मुळ भारतीय वंशाच्या वनीजा रूपाणी (17) हिने हेलिकॉप्टरला इंजीन्यूटी नाव दिले आहे. हिंदीत याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीचे शोधचरित्र असा होतो. वनीजा अलाबामा नॉर्थ पोर्टमध्ये हायस्कूल ज्यूनियर आहे. मंगळ हेलिकॉप्टरच्या नामकरणासाठी नासाने ’नेम द रोव्हर’ नावाची एक स्पर्धा आयोजित केली होती, ज्यामध्ये 28,000 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये वनीजाकडून सुचवण्यात आलेले नाव फायनल करण्यात आले.

नासाने सांगितले की, मंगळाच्या वातावरणात हे छोटे हेलिकॉप्टर पृष्ठभागापासून 10 फुट ऊंच उडून एकावेळी 6 फुटापर्यंत जाईल. यासोबतच ते आणखी पुढे जाईल. नासामध्ये या प्रोजेक्टचे मॅनेजर मिमि आंग यांनी म्हटले की, हे उड्डाण तेवढेच रोमांचक असेल जेवढे पहिल्या राइट ब्रदर्ससाठी असेल.

या मिशनमध्ये हेलिकॉप्टरकडे उड्डाणासाठी एक महिन्याचा वेळ असेल. जर हे यशस्वी झाले तर येत्या काळात आणखी असे प्रयोग दिसून येतील. नासाच्या या प्रीझर्व्हन्स रोव्हरमध्ये अनेक कॅमेरे, मायक्रोफोन लावले आहेत, जे मंगळाचे फोटो आणि आवाज रेकॉर्ड करतील.

या नव्या प्रयोगावर एक 3 मिनिटाच्या व्हिडिओत नासाने सांगितले की, कशाप्रकारे मंगळ ग्रहावर हे छोटे हेलिकॉप्टर काम करेल. मिशनशी संबंधीत एका अधिकार्‍याने सांगितले की, जर हे यशस्वी झाले तर आमच्यासाठी हा मैलाचा दगड ठरेल. नासाच्या प्रोजेक्ट मॅनेजरने म्हटले की, याच्या यशानंतर अंतराळाचा शोध घेणे आमच्यासाठी आणखी सोपे होईल.

आणखी एका अधिकार्‍याने म्हटले की, मंगळावर उड्डाण घेण्यासाठी खुप मोठा अडथळा आहे तेथील वातावरण. ग्रहाच्या आजूबाजूची हवा पृथ्वीच्या वायुमंडळाच्या आकाराच्या अवघी 1 टक्का आहे. इतक्या कमी हवेत फिरण्यासाठी मंगळावर लिफ्ट मिळणे अवघड असेल. जे तंत्रज्ञान आपण पृथ्वीवर वापरतो, ते मंगळावर वापरू शकत नाही. यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञान वापरले आहे.