दिवसा कामादरम्यान डुलकी घेतल्याने कामाचा स्पीड वाढतो : नासाचे संशोधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – झोपेचा आणि आरोग्याचा खूप जवळचा संबंध असतो. जास्तवेळ झोपणे किंवा कमीवेळ झोपणेही शरीरासाठी धोकादायक आहे. एखाद्या व्यक्तीला दिवसा झोप येत असेल तर त्याने निश्चिंत डुलकी घ्यावी. कामावेळी डुलकी घेतल्याने त्या व्यक्तीला फ्रेश वाटेल आणि त्याचा काम करण्याचा स्पीडही वाढेल. अशी माहिती अमेरिकेच्या नासा या संस्थेने एका रिसर्चच्या माध्यमातून दिली आहे.

नासाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एक वेळ अशी असते जेव्हा प्रत्येक व्यक्तीला फार थकवा जाणवतो. अशावेळी १० ते २० मिनिटांची झोप घेणे चांगले ठरेल. ही झोप तुम्हाला अनेक तासांसाठी रिचार्ज करते आणि तुम्ही पुन्हा नव्याने काम करु शकता. दिवसा घेतली गेलेली एक डुलकी एक रात्र झोपून मिळणाऱ्या एनर्जी इतकी एनर्जी देते. डुलकी घेतल्याने व्यक्तीचा मूड, सतर्कता आणि कामात अधिक सुधारणा होते. जर तुम्ही असं करत नसाल तर ब्रेनची कार्यक्षमतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्ही थकलेले आणि सुस्त राहू लागता. मात्र जास्तवेळ घेतलेली डुलकी तुम्हाला झोपेच्या स्थितीत नेऊ शकते. त्यामुळे केवळ १० ते २० मिनिटांची डुलकी घ्यावी.

दिवसा झोप घेण्याचे फायदे –

१० ते २० मिनिटांची डुलकी घेतल्याने थकलेला मेंदू आणि सुस्त झालेल्या मांसपेशींना आराम मिळतो. ज्याने तुम्हाला फ्रेश वाटतं.
कामावेळी डुलकी घेतल्याने व्यक्तीचा काम करण्याचा स्पीडही वाढेल. डुलकी घेतल्याने कार्य करण्याची क्षमता वेगाने वाढते.